मोदी सरकार शेतकर्‍यांना शेतमाल व साधने खरेदीसाठी देत आहे 80 टक्के अनुदान; जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शेतकर्‍यांच्या अडचणी दूर करण्यासाठी भारत सरकारने अनेक योजना आणल्या आहेत. या भागामध्ये सरकारने शेतकर्‍यांसाठी स्माम किसान योजनासुद्धा (SMAM Kisan Yojana) सुरू केली आहे. या योजनेंतर्गत सरकार शेतकर्‍यांना शेतीची साधने उपकरणे खरेदी करण्यास मदत करीत आहे. यावर सरकार 80 टक्के अनुदान देत आहे. केंद्राने कृषी क्षेत्रात यांत्रिकीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी या योजनेंतर्गत राज्यांना 553 कोटी रुपये दिले आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला https://agrimachinery.nic.in/ या अधिकृत वेबसाइटवर जाऊन मदत मिळू शकेल.

50 ते 80 टक्के अनुदानावर कृषी उपकरणे उपलब्ध असतील
केंद्र सरकार या स्माम किसान योजनेंतर्गत कृषी उपकरणांवर 50 ते 80 टक्के अनुदान देत आहे. ही योजना देशातील सर्व राज्यांतील शेतकऱ्यांना उपलब्ध आहे. या योजनेस पात्र असणारा देशातील कोणताही शेतकरी या योजनेसाठी अर्ज करू शकतो. महिला शेतकरीही या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी या कागदपत्रांची आवश्यकता आहे.

लाभार्थीच्या ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड
पासपोर्ट आकाराचा फोटो
जमिनीचा तपशील जोडताना रेकॉर्ड करण्यासाठी जमीनीचे अधिकार पत्र (ROR)
लाभार्थ्यांची माहिती असलेल्या बँक पास बुकच्या पहिल्या पानाची कॉपी.
कोणत्याही आयडी पुराव्याची कॉपी (आधार कार्ड / ड्रायव्हिंग लायसन्स / वोटरआयड कार्ड / पॅनकार्ड / पासपोर्ट)
अनुसूचित जाती / जमाती / ओबीसी बाबतीत जाती प्रवर्गाच्या दाखल्याची कॉपी.

अर्ज करण्यासाठी या गोष्टी फॉलो करा
डीबीटी पोर्टलमध्ये नोंदणी करतांना, शेतकऱ्यास ड्रॉप डाऊन सूचीतून योग्य जिल्हा, उपजिल्हा, गट आणि गाव निवडावे लागेल. शेतकऱ्याचे नाव आधार कार्डनुसार असावे. शेतकरी वर्ग (अनुसूचित जाती / जमाती / सर्वसाधारण), शेतकरी प्रकार (लहान / सीमान्त / मोठे) आणि लिंग (पुरुष / महिला) योग्यरित्या भरावे अन्यथा पडताळणीच्या वेळी अर्ज रद्द केला जाईल. अनुदानाचा लाभ घेण्यासाठी योग्य तपशील देणे ही शेतकर्‍याची जबाबदारी आहे.

अधिक माहितीसाठी आपल्या राज्यानुसार या नंबरवर संपर्क साधा.
उत्तराखंड – 0135- 2771881
उत्तर प्रदेश – 9235629348, 0522-2204223
राजस्थान- 9694000786, 9694000786
पंजाब- 9814066839, 01722970605
मध्य प्रदेश – 7552418987, 0755-2583313
झारखंड – 9503390555
हरियाणा- 9569012086
बिहार- 9431818911, 9431400000

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment