दिवाळीपूर्वी स्वस्तात सोने खरेदी करण्याची सुवर्ण संधी, केंद्राच्या ‘या’ योजनेचा असा घ्या लाभ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । सरकार पुन्हा एकदा तुम्हाला स्वस्त सोनं खरेदी करण्याची संधी देत ​​आहे (Buy Gold with Modi Govt scheme). सॉवरेन गोल्ड बॉन्ड योजनें(Sovereign Gold Bond Scheme)तर्गत सरकार सातवी सिरीज जारी करणार आहे. 12 ते 16 ऑक्टोबर या कालावधीत सॉवरेन गोल्ड बॉन्ड योजनेचं सबक्रिप्शन घेतले जाऊ शकते. सेटलमेंटची तारीख 20 ऑक्टोबर आहे. रिझर्व्ह बँकेच्या संमतीनंतर जे गुंतवणूकदार ऑनलाइन सॉवरेन गोल्ड बॉन्ड खरेदी करतील, त्यांना 50 रुपयांची सूट मिळेल. त्यासाठी पेमेंट ऑनलाईन करावे लागेल.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया(RBI)ने निवेदनात म्हटले आहे की, सोन्याच्या बाँडची किंमत प्रति ग्रॅम 5,051 रुपये निश्चित करण्यात आली आहे. ऑनलाईन सोने खरेदी करणार्‍यांसाठी किंमत प्रति ग्रॅम 5001 रुपये असेल. यापूर्वी बाँड सीरिज-6 ची इश्यू किंमत प्रति ग्रॅम 5117 रुपये होती आणि ही सदस्यता 31 ऑगस्ट ते 4 सप्टेंबरदरम्यान खुली होती. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया(RBI)ने सरकारच्या वतीने स्वखर्चाने सॉवरेन गोल्ड बाँड जारी केले आहेत.

काय आहे केंद्राची सॉवरेन गोल्ड बाँड योजना
सॉवरेन गोल्ड बाँड योजना ही सोन्यातील गुंतवणुकीची योजना असून, ती रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया(RBI)ने भारत सरकारच्या वतीने जारी केली आहे. या योजनेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे सोन्याची फिजिकल मागणी कमी करणे, जेणेकरून भारताची सोन्याची आयात कमी होऊ शकेल. ही योजना 2015मध्ये सुरू केली गेली. गुंतवणुकीचे बरेच फायदे आहेत? कर्ज घेण्याकरिता सॉवरेन गोल्ड बाँडचा उपयोग कर्ज घेण्यासाठी किंवा कोलॅटरलच्या स्वरूपात केला जातो. हे बाँड रिझर्व्ह बँकेद्वारे जारी केले जातात, म्हणूनच बाँड जारी करणारी कंपनी दिवाळखोरीत जाऊ नये किंवा पळ काढू नये, असा धोका गुंतवणूकदार टाळू शकतात. या बाँडचा एक्सचेंजमध्ये व्यवहार केला जाऊ शकतो, जेणेकरून गुंतवणूकदार इच्छुक असल्यास वेळेआधी बाहेर पडू शकतील. सोन्याच्या किंमतीत वाढ होण्याबरोबरच गुंतवणूकदाराला 2.5% दराने अतिरिक्त व्याजही मिळते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”

Leave a Comment