1600 हून अधिक भारतीय कंपन्यामध्ये चीनने गुंतवले आहेत 7500 कोटी रुपये, सरकारने संसदेत दिली माहिती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एप्रिल 2016 ते मार्च 2020 या कालावधीत देशातील 1,600 हून अधिक भारतीय कंपन्यांना चीनकडून एक अब्ज डॉलर्सची थेट परकीय गुंतवणूक (FDI) मिळाली. सरकारी आकडेवारीत ही माहिती देण्यात आली आहे. मंगळवारी राज्यसभेत लेखी उत्तरात ही आकडेवारी देण्यात आली.

चीनी कंपन्यांकडून भारतीय कंपन्यांत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे ही वस्तुस्थिती आहे का असा प्रश्न सरकारला पडला. सरकारी आकडेवारीनुसार, एप्रिल 2016 ते मार्च 2020 या कालावधीत 1,600 हून अधिक भारतीय कंपन्यांना चीनकडून 102 कोटी 2.5 लाख डॉलर्स (1.02 अरब डॉलर्स) ) थेट परकीय गुंतवणूक (FDI) मिळाली.

या कंपन्या 46 प्रदेशात होत्या. यापैकी ऑटोमोबाईल उद्योगातील कंपन्यांनी, पुस्तकांचे प्रिंटिंग (लिथो प्रिंटिंग उद्योगासह), इलेक्ट्रॉनिक्स, सेवा आणि विद्युत उपकरणांना या काळात चीनकडून 10 कोटी डॉलर्सपेक्षा जास्त FDI प्राप्त झाला. या आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की, ऑटोमोबाईल उद्योगाला चीनकडून सर्वाधिक 17.2 कोटी डॉलरची थेट परदेशी गुंतवणूक मिळाली.

सेवा क्षेत्राला 13 कोटी 96.5 लाख डॉलर्सची FDI मिळाली. कॉर्पोरेट व्यवहार राज्यमंत्री अनुरागसिंग ठाकूर यांनी लेखी उत्तरात म्हटले आहे की,’ कॉर्पोरेट अफेयर्स मंत्रालयाला चिनी एजन्सींनी केलेल्या गुंतवणूकीची माहिती नाही.’

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
x Close

Like Us On Facebook

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com