कोल्हापूरकरांसाठी खूशखबर! मटणदरावर अखेर तोडगा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोल्हापूर प्रतिनिधी | कोल्हापूर येथील मटण दरावर आज तोडगा निघाला आहे. मटणविक्रेते आणि कृती समिती यांच्यात झालेल्या बैठकीतून मटण दर निश्चित करण्यात आले आहेत.

कोल्हापूरात मांसाहार खाणार्‍यांची संख्या बहुसंख्य आहे. अशात मागील काही महिण्यांपासून कोल्हापूर येथे मटणाचे दर गगणाला भिडले होते. मात्र आज अखेर यावर तोडगा निघाला आहे. मटणविक्रेते आणि कृती समिती यांच्यात झालेल्या बैठकीतून मटणदर ५२० रुपये प्रति किलो असे निश्चित करण्यात आले आहेत.

नवीन वर्ष सुरु झाल्यापासून कोल्हापूरकरांना मटणावर ताव मारता आला नव्हता. आता मटण दर निश्चित झाल्याने आजपासून रविवार आणि बुधवार मटणाच्या दुकानांवर पुन्हा नागरिकांची गर्दी पहायला मिळणार आहे.

Leave a Comment