रेल्वेने तिकीट आरक्षण प्रक्रियेत केला ‘हा’ मोठा बदल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । जवळपास २ महिन्यांसाठी ठप्प झालेली भारतीय रेल्वे सेवा आता येत्या काळात पुन्हा एकदा रुळावर आणण्यासाठीचे केंद्र आणि रेल्वे मंत्रालयाचे प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी आवश्यक ते निर्णय आणि नवी नियमावलीसुद्धा टप्प्याटप्प्याने लागू करण्यात येत आहे. सध्या श्रमिक ट्रेनच्या माध्यमातून रेल्वे हळूहळू रुळावर येत आहे. दरम्यान, रेल्वेने प्रवासी वाहतूक पूर्वपदावर आणण्यासाठी तिकीट आरक्षण प्रक्रियेत एक बदल केला आहे.

येत्या १ जूनपासून रेल्वे मंत्रालयाकडून हे नवे नियम लागू करण्यात येणार असून, आरक्षित तिकिटांनीच प्रवास करु इच्छिणाऱ्यांसाठी आता मार्ग मोकळा झाला आहे. यापुढे लांब पल्ल्याच्या रेल्वेने प्रवास करु इच्छिणाऱ्यांसाठी १२० दिवस आधी आगाऊ प्रवासी आरक्षणाची सुविधा उपलब्ध असेल. यापूर्वी २२ मे पासून रेल्वे तिकीट आरक्षणाची सुरुवात करण्यात आली होती. ज्यानंतर पुन्हा एकदा रेल्वे मंत्रालयानं हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

३ महिने आगाऊ तिकीट काढण्याची मुभा असल्यामुळं आता प्रवाशांना त्यांच्या प्रवासाची आखणी करणं शक्य होणार आहे. ३ महिन्यांसाठी तिकीटाचं आरक्षण करण्यासोबतच करंट सीट बुकींग, तात्काळ कोटा आणि प्रवासादरम्यान येणाऱ्या स्थानांसाठीच्या तिकीट आरक्षणाचीही सुविधा उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या काळात जवळपास २३० रेल्वे गाड्यांसाठी ही आरक्षण सुविधा उपलब्ध करुन दिली जाणार आहे. ज्यासाठी शासनाकडून देशभरात दोन लाखांहून अधिक कॉमन सर्व्हिस सेंटर म्हणजेच CSC वरुनही तिकीट आरक्षण करण्याची सोय उपलब्ध करुन दिल्याचं कळत आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment