एकदम बेस्ट! आता Amazonवरून बुक करा गॅस सिलिंडर; जाणून घ्या नेमकं कसं?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । घरगुती गॅस सिलिंडर बुक करण्यासाठी ग्राहकांना आता आणखी एक पर्याय उपलब्ध होणार आहे. अ‍ॅमेझॉनवरून ग्राहक नेहमीच वेगवेगळ्या वस्तू ऑर्डर करत असतात. मात्र आता ग्राहकांना अ‍ॅमेझॉनवर सिलिंडर बुक करता येणार आहे. अ‍ॅमेझॉन इंडियाने हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडशी करार केला आहे. त्यानुसार आता HP कंपनीचा सिलिंडर वापरणाऱ्या ग्राहकांना अ‍ॅमेझॉनवरुन पैसे भरुन सिलिंडर घेता येणार आहे. (Gas Cylinder booking)

ग्राहकांना त्यामुळे IVRच्या माध्यमातून सिलिंडर बुक करण्याची आवश्यकता नाही. सिलिंडर बुक करायचा असल्यास थेट अ‍ॅमेझॉनच्या वेबसाईटवर जाऊन नोंदणी करावी लागेल. अ‍ॅमेझॉन-पे टॅबवर जाऊन बुकिंग करावं लागेल. त्यानंतर कोणत्याही डिजिटल मोडचा वापर करून पैसे देता येतील. आम्ही डिजिटल पेमेंटमध्ये सातत्याने नवनवीन अनुभव आणण्याचा प्रयत्न करत आहोत अशी माहिती अ‍ॅमेझॉन-पे चे सीईओ महेंद्र नेरुरकर यांनी दिली आहे.

अ‍ॅलेक्सा आणि फायर टीव्ही स्टिक या तंत्रज्ञानाच्या मदतीनेही ग्राहकांना सिलिंडर बुक करता येणार आहे. मात्र, HP गॅस कंपनीच्या ग्राहकांनाच ही सुविधा देण्यात आली असून त्यांनाच अ‍ॅमेझॉनवरून सिलिंडर बुक करता येणार आहे. घरगुती वापरासाठी आवश्यक असलेल्या एलपीजी सिलेंडरच्या होम डिलिव्हरीचे नियम बदलले आहेत. सिलेंडरची चोरी रोखण्यासाठी आणि योग्य ग्राहकाची ओळख पटवण्यासाठी कंपन्या डिलिव्हरी सिस्टिम लागू करण्यात आली आहे. नव्या सिस्टिमला DAC असं नाव देण्यात आलं आहे. त्याचा अर्थ डिलिव्हरी ऑथेंटिकेशन कोड असा आहे.

 असा करा बुक अ‍ॅमेझॉनवरून गॅस सिलिंडर

१)सिलिंडर बुक करण्यासाठी सर्वप्रथम अ‍ॅमेझॉन पे टॅबवर जा.

२)LPG कॅटेगरीवर क्लिक करावे.

३)तुमचा नोंदणीकृत मोबाईल क्रमांक किंवा HP गॅसचा 17 अंकी नंबर टाकावा लागेल.

४)ग्राहकाच्या मोबाईलवर कन्फर्म करण्यासाठी एक मेसेज येईल. तो कन्फर्म करताच तुमचा सिलेंडर बुक होईल.

५)अ‍ॅमेझॉन पेमेंटच्या साहाय्याने पैसे भरल्यास ग्राहकांना 50 रुपयांचा कॅशबॅकही मिळेल.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा. ब्रेकिंग बातम्यासाठी लॉगइन : www.hellomaharashtra.in

 

Leave a Comment