आता रुग्णालयाचे बिल भरण्यासाठी HDFC Bank देणार 40 लाखांपर्यंतचे Personal Loan

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर देशातील सर्वात मोठी खासगी बँक एचडीएफसी बँकने अपोलो रुग्णालयाच्या (Apollo Hospital) सहकार्याने आपल्या ग्राहकांसाठी ‘द हेल्दी लाइफ प्रोग्राम’ (The Healthy Life Programme) सुरू केला आहे. त्याअंतर्गत बँक रूग्णालयाचे बिल भरण्यासाठी ग्राहकांना 40 लाख रुपयांपर्यंत अनसिक्‍योर्ड पर्सनल लोन (Unsecured Loan) देत आहे. हे पर्सनल लोन अर्ज केल्याच्या 10 सेकंदात ग्राहकांच्या बँक खात्यात पोहोचेल. बँकेने आपल्या ग्राहकांना क्रेडिट किंवा डेबिट कार्डवर नो-कॉस्ट ईएमआय (No Cost EMI) ही ऑफर केली आहे.

या प्रोग्राममध्ये लाइफकेयरसमवेत अशा उपचारांचा समावेश केला गेला आहे
एचडीएफसी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि एमडी आदित्य पुरी म्हणाले की, गरज भासल्यास हे लोन ग्राहकांना त्वरित त्यांच्या बँक खात्यात (DBT) ट्रान्सफर केले जातील. या कार्यक्रमाअंतर्गत लाइफकेयर फायनान्ससह डोळे आणि डेंटल केयर, प्रसूती, आयव्हीएफ यांचा समावेश आहे. क्रेडिट कार्ड सुविधेबरोबरच या कार्डवर ईएमआय, इन्स्टंट डिस्काउंट्स, खर्च आधारित सवलतीच्या सुविधा देखील मिळणार आहेत. या कार्यक्रमाचा एचडीएफसी बँकेच्या साडेसात कोटी ग्राहकांना फायदा होणार असल्याचे अपोलोच्या कार्यकारी उपाध्यक्ष शोबाना कामिनेनी यांनी सांगितले.

एचडीएफसी ग्राहक अपोलोच्या डॉक्टरांचा सल्ला फ्री मध्ये घेतील
हा एक कंसोलिडेटेड हेल्थकेयर सॉल्यूशन आहे जो अपोलोच्या डिजिटल प्लॅटफॉर्म अपोलो 24/7 वर सुविधा देतो. हा प्रोग्राम एचडीएफसी बँकेच्या ग्राहकांसाठी खास बनविला गेला आहे, जे 24/7 मध्ये आपत्कालीन अपोलो डॉक्टरकडे पोहोचू शकतात. तसेच, एचडीएफसी बँकेच्या ग्राहकांना या कार्यक्रमाअंतर्गत आणखीही बरेच फायदे मिळतील. यामध्ये सर्व अपोलो रुग्णालयांमध्ये पेमेंट पर्यायांची निवड आणि उपचारांसाठी सुलभ फायनान्स सुविधेचा समावेश केला आहे आहे. त्याच वेळी, अपोलो डॉक्टरची कॉल सेवा कोणत्याही वेळी उपलब्ध असेल. पहिल्या वर्षासाठी अपोलो मेंबरशिप देखील उपलब्ध असेल. याशिवाय अपोलो 24/7 वर क्रॉनिक केअर सुविधा देखील उपलब्ध असेल.

अपोलो 24/7 वर औषधांची होम डिलीव्हरी, मेंबरशिप डिस्काउंट्स देखील
अपोलो 24/7 वर औषधांची होम डिलीव्हरी देखील मेंबरशिप डिस्काउंट्स देखील आहे. व्हॉट्सअॅप बेस्ड concierge सेवासुद्धा उपलब्ध करुन देण्यात येईल. या उपक्रमांतर्गत एचडीएफसी ग्राहकांना आरोग्य तपासणीचा लाभ मिळणार आहे. मेडिकल इमरजेंसी किंवा आरोग्य राखण्यासाठी दोन सर्वात मोठी आव्हाने हे आहेत की मोठ्या प्रमाणात विश्वसनीय गुणवत्तेसह आरोग्य सेवा आणि सुलभ वित्त उपलब्धता. या दोघांसोबत येऊन लोकांना मोठा फायदा होईल. अपोलो हॉस्पिटलच्या मते, भारतीय अपोलोपैकी 40 टक्के फार्मसीपासून 30 मिनिटांच्या अंतरावर आहे. त्याचबरोबर एचडीएफसी बँकेच्या देशातील 85 टक्के जिल्ह्यात शाखा आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment