डिसेंबरच्या पहिल्याच दिवशी ‘या’ बँकेने आपल्या ग्राहकांना दिली मोठी भेट! आपला EMI झाला कमी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । सीएसबी बँकेने (CSB Bank) आपल्या ग्राहकांना चांगली बातमी दिली आहे. बँकेने आपल्या 6 महिन्यांच्या मुदतीच्या कर्जावरील एमसीएलआर (MCLR) मध्ये 0.10 टक्के कपात केली आहे. याबाबत एक स्टेटमेंट जारी करुन बँकेने याबाबतची माहिती दिली आहे. हे नवीन व्याजदर 1 डिसेंबर 2020 पासून लागू होतील असे बँकेने म्हटले आहे. तथापि, एका वर्षाच्या कालावधीसाठी कर्जाच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. एका वर्षासाठी कर्ज घेणाऱ्या ग्राहकांचा व्याज दर 9.50 टक्के असेल.

असे असतील व्याज दर
एका दिवसापासून ते सहा महिन्यांच्या कर्जावर, फंडाचा किरकोळ खर्च आधारित व्याज दर 7.70 ते 8.50 टक्क्यांच्या दरम्यान असेल.

नवीन दर जाणून घ्या

> Overnight MCLR – 7.70% p.a.
> One month MCLR – 7.80% p.a.
> Three month MCLR – 8.10% p.a.
> Six month MCLR – 8.50% p.a.
> One Year MCLR – 9.50% p.a.

अनेक बँका MCLR रिवाइज केले
अनेक बँकांनी त्यांच्या कर्जाचे दर रिवाइज केले आहेत. बँक ऑफ बडोदा, युनियन बँक, एसबीआय, पंजाब नॅशनल बँक, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँकेसह अनेक बँकांनी MCLR ला रिवाइज केले आहे.

अलीकडेच बँकेने आपला आयपीओ स्टॉक मार्केटमध्ये आणला आहे. ज्यांनी सीएसबी बँकेच्या आयपीओमध्ये (CSB Bank IPO) पैसे ठेवले त्यांनी मोठा नफा कमावला आहे. हा शेअर 195 रुपयांच्या इश्यू प्राईसच्या तुलनेत 275 रुपयांवर लिस्ट आहे. याचा अर्थ असा की, एका गुंतवणूकीवर गुंतवणूकदारांना 80 रुपयांची वाढ मिळाली आहे. यापूर्वी बँक कॅथोलिक सीरियन बँक (Catholic Syrian Bank) म्हणून ओळखली जात होती. CSB बँक मुख्यतः केरळ, तामिळनाडू, कर्नाटक आणि महाराष्ट्रात मजबूत आहेत.

बँकेची स्थिती कशी आहे
31 मार्च 2019 पर्यंत या बँकेचा सकल NPA 4.87 टक्के होता, जो 31 मार्च 2017 पर्यंत 7.25 टक्के होता. 30 सप्टेंबर 2019 रोजी त्याचा सकल NPA 2.86 टक्के होता. 31 मार्च 2019 पर्यंत त्याचा निव्वळ NPA 2.27 टक्के होता, जो 31 मार्च 2017 पर्यंत 4.12 टक्के होता. 30 सप्टेंबर रोजी हा आकडा 1.96 टक्के होता.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment