नवीन वर्षात ONGC करणार ‘या’ दोन कंपन्यांचे विलीनीकरण, योजना काय आहे ते जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सरकारी तेल कंपनी तेल आणि नैसर्गिक गॅस कॉर्पोरेशन (ONGC) या दोन रिफायनरी कंपन्यांचे विलीनीकरण होणार आहे. ONGC च्या या दोन कंपन्या म्हणजे हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) आणि मंगलोर रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल्स लिमिटेड (MRPL). एका अहवालात म्हटले आहे की, जून 2021 पर्यंत ONGC या दोन कंपन्यांच्या विलीनीकरणावर विचार करेल. ONGC चे अध्यक्ष शशी शंकर यांनीही याची पुष्टी केली आहे. जून 2021 नंतर ही तेल कंपनी या ऑईल रिफायनरी कंपन्यांचे विलीनीकरण करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

दोन्ही कंपन्यांमध्ये ONGC चा किती हिस्सा आहे?
दोन वर्षांपूर्वी ONGC ने 36,915 कोटी रुपयांमध्ये HPCL चे अधिग्रहण पूर्ण केले होते. त्यानंतर ONGC कडे तेल शुद्धीकरण व्यवसायाशी संबंधित दोन कंपन्या आहेत – HPCL आणि MRPL. ONGC चा HPCL मध्ये 51.11 टक्के तर MRPL मध्ये 71.63 टक्के हिस्सा आहे. HPCL चा ही MRPL मध्ये 16.96 टक्के हिस्सा आहे.

विलीनीकरणाचा काय फायदा?
शशी शंकर म्हणाले की, HPCL आपल्या रिफायनरीजमध्ये उत्पादन करण्यापेक्षा जास्त इंधन विकते. दुसरीकडे, MRPL ही पूर्णपणे रिफायनिंग कंपनी आहे. ते म्हणाले की MRPL चे HPCL मध्ये विलीनीकरण करणे तर्कसंगत आहे. यामुळे HPCL ला इंधनाच्या मार्केटिंगमध्ये संतुलन साधण्यास मदत होईल. त्यामुले HPCL ला अन्य कंपन्यांकडून इंधन घेण्याची आवश्यकता राहणार नाही.

ONGC वर तोटा
शुक्रवारी ONGC ने अशी माहिती दिली आहे की,त्यांना नैसर्गिक वायू व्यवसायात सुमारे सहा हजार ते सात हजार कोटी रुपयांचे नुकसान होत आहे. केंद्र सरकारच्या निर्णयानंतर ONGC ला हे नुकसान सहन करावे लागत आहे, ज्यामध्ये इंधनाची किंमत जवळजवळ गेल्या दशकांच्या नीचांकी पातळीवर गेली आहे. कंपनीचे आर्थिक संचालक सुभाष कुमार म्हणाले होते की, सरकारने ठरविलेली किंमत उत्पादन खर्चापेक्षा खूपच कमी आहे. नैसर्गिक वायू उत्पादन खर्च 3.5-3.7 डॉलर प्रति मिलियन ब्रिटिश थर्मल यूनिट इतका आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment