जर पैसे सुरक्षित ठेवायचे असतील तर SBI च्या ‘या’ सल्ल्यावर करा विचार, नाहीतर होईल ‘हे’ नुकसान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या 42 कोटी खातेदारांना सावध केले आहे. कोरोनाच्या सध्याच्या काळात डिजिटल ट्रांझॅक्शन वाढीचा फायदा सायबर गुन्हेगार घेत असल्याचे एसबीआयचे म्हणणे आहे. लॉकडाऊनमध्ये ऑनलाइन फसवणूकीच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. या सर्व बाबी लक्षात घेता एसबीआयने आपल्या ग्राहकांना सावध करताना ऑनलाइन ट्रांझॅक्शन करण्यासाठी काही सेफ्टी टिप्स दिलेल्या आहेत. जर आपल्याकडे देखील देशातील या सर्वात मोठ्या बँकेचे खाते असेल तर आपण या टिप्सना फॉलो करून आपले पैसे सुरक्षित ठेवू शकता.

एसबीआयने ट्विटरवर एक ट्वीट शेअर करुन लोकांना ऑनलाइन बँकिंग करताना सावध रहायला सांगितले आहे. एसबीआयने ट्विट केलेल्या या व्हिडिओमध्ये फायनान्सशियल सर्विसेज सेक्टर हे नेहमीच सायबर गुन्हेगारांचे लक्ष्य असते. जर आपल्यालाही असे फ्रॉड कॉल, ईमेल किंवा टेक्स्ट मेसेजेस येत असेल, ज्यात आपल्याला पर्सनल डिटेल्स शेअर करण्यास सांगितले गेले किंवा त्वरित पैशाची मागणी केली गेली. जर आपल्या बँक खात्यातून असे कोणतेही ट्रांझॅक्शन झाले असेल जे आपण केलेले नाहीत तसेच जर आपण आपली पर्सनल इंफॉर्मेशन किंवा अकाउंटची स्पेसिफिक माहिती कोणाबरोबर तरी शेअर केली असेल तर आपणही एखाद्या सायबर गुन्हेगाराला बळी पडला असाल तर कृपया स्थानिक पोलिसांना किंवा सायबर क्राइम रिपोर्टिंग पोर्टल https://cybercrime.gov.in/ वर कळवा. त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नका. या प्रकरणाचा रिपोर्ट करा. जेणेकरुन हे जग सर्वांसाठी एक सुरक्षित स्थान बनू शकेल.

 

नवीन प्रकारे होणाऱ्या पैशाच्या चोरीबद्दलची दिली माहिती
एसबीआय ग्राहकांना त्यांचे अकाउंट सुरक्षित ठेवण्यासाठीची माहिती देत ​​आहे. अलीकडेच एसबीआयने आपल्या ग्राहकांना ऑनलाईन बँकिंगसाठी स्ट्रॉंग पासवर्ड तयार करण्याचा सल्ला दिला आहे. एसबीआयने ट्विटद्वारे पासवर्ड स्ट्रॉंग ठेवण्याचा सल्ला दिला आहे. एसबीआयने ग्राहकांना त्यांचा पासवर्ड अपडेट करण्यास सांगितले आहे.

या ट्वीटच्या माध्यमातून एसबीआयने स्ट्रॉंग पासवर्ड कसा बनवायचा हे शिकवले आहे. हे आपल्या कुटुंबातील सदस्यांचे नाव असू नये हे देखील लक्षात ठेवण्यास सांगितले, कारण यामुळे आपल्या अकाउंटची सुरक्षा धोक्यात येऊ शकते. हॅकर्सना अंदाज लावणे कठीण होईल अश्या प्रकारचा पासवर्ड ठेवणे अपेक्षीत आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

 

Leave a Comment