स्वातंत्र्य दिनाच्या दुसर्‍या दिवशी पेट्रोल झाले महाग, आपल्या शहरातील किंमत जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । स्वातंत्र्य दिनाच्या दुसर्‍या दिवशी सर्वसामान्यांना मोठा धक्का बसला आहे. सरकारी ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी (OMCs) रविवारी पेट्रोलच्या दरात वाढ केली आहे. सरकारी तेल कंपन्या इंडियन ऑइल (IOC), भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. (BPCL) आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. (HPCL) रविवारी राष्ट्रीय राजधानीत पेट्रोलच्या किंमतीत 14 पैशांची वाढ केली आहे. मात्र, डिझेलच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही. राजधानी दिल्लीत आता तुम्हाला लिटर पेट्रोलसाठी 80.57 रुपये द्यावे लागतील. त्याचबरोबर एक लिटर डिझेलची किंमत 73.56 रुपये आहे.

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलचे दर बदलतात. नवीन दर हे सकाळी 6 वाजेपासून लागू होतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत एक्साइज ड्यूटी, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते. परदेशी विनिमय दरासह आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडचे दर काय आहेत यावर अवलंबून पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज बदलत असतात.

देशातील मोठ्या शहरांमध्ये आजच्या पेट्रोल डिझेलच्या नवीन किंमती काय आहेत ते जाणून घ्या.
दिल्ली पेट्रोल 80.57 रुपये आणि डिझेल प्रति लिटर 73.56 रुपये आहे.
मुंबई पेट्रोलची किंमत 87.31 रुपये आणि डिझेलची किंमत 80.11 रुपये प्रतिलिटर आहे.
कोलकाता पेट्रोल 87.31 रुपये आणि डिझेल 77.06 रुपये प्रति लिटर आहे.
चेन्नई पेट्रोलची किंमत 83.75 रुपये आणि डिझेलची किंमत 78.86 रुपये प्रतिलिटर आहे.
नोएडा पेट्रोल 81.24 रुपये तर डिझेल 73.87 रुपये प्रतिलिटर आहे.
गुरुग्राम पेट्रोल 78.81 रुपये तर डिझेल 74.03 रुपये प्रतिलिटर आहे.
लखनऊ पेट्रोल 81.13 रुपये तर डिझेल 73.77 रुपये प्रतिलिटर आहे.
पटना पेट्रोल 83.39 आणि डिझेल 78.72 रुपये प्रतिलिटर आहे.
जयपूर पेट्रोल 87.73 रुपये तर डिझेल 82.62 रुपये प्रतिलिटर आहे.

घरबसल्या आपल्या शहरातील पेट्रोलची किंमत काय आहेत ते जाणून घ्या
एसएमएसद्वारे कोणतीही व्यक्ती दररोज आपल्या शहरातील पेट्रोल डिझेलची किंमत देखील तपासू शकते. इंडियन ऑईल ग्राहक आरएसपी <डीलर कोड> हा नंबर 9292992249 वर पाठवू शकतात आणि बीपीसीएल ग्राहक आरएसपी <डीलर कोड> क्रमांक 9223112222 वर लिहू शकतात. एचपीसीएल ग्राहक एचपीपीआरआयएस <डीलर कोड> 9222201122 क्रमांकावर पाठवू शकतात.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा.

ब्रेकिंग बातम्यासाठी : www.hellomaharashtra.in

Leave a Comment