सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल-डिझेल दर वाढ, जाणून घ्या तुमच्या शहरातील इंधनाचे दर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । पेट्रोल आणि डिझेलच्या (Petrol-Diesel) किंमती गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढत आहेत. इंधनाच्या वाढत्या दरानं सर्वसामान्यांची चिंता वाढवली आहे. बुधवारपासून सरकारी तेल कंपनी असलेली इंडियन ऑईल (IOC), बीपीसीएल (BPCL) आणि एचपीसीएल (HPCL) ने बुधवारी पेट्रोलचे भाव 15 पैसे प्रतिलिटर आणि डिझेलचे भाव 23 पैसे प्रतिलिटरनं वाढवले होते. गुरुवारी त्यामध्ये आणखी वाढ झाली आहे. गुरुवारी पेट्रोलची किंमत 17 पैशांनी तर डिझेची किंमत 19 पैशांनी वाढली आहे. आता राजधानी दिल्लीत 1 लिटर पेट्रोलचा भाव 82.66 रुपये झाला आहे. तर एक लिटर डिझेलचा भाव 72.84 रुपये झाला आहे.

14 दिवसांत मोठ्या प्रमाणात तेलाच्या किमतीत वाढ
20 नोव्हेंबरनंतर वाहनांच्या इंधनाच्या किमतीत 10 टक्के वाढ झाली आहे. दोन आठवड्यांच्या दिलाशानंतर पेट्रोलियम कंपन्यांनी इंधनाचे दर पुन्हा एकदा वाढवले आहेत. 14 दिवसांत पेट्रोल 1.63 रुपये प्रति लीटर महागले आहे. त्याचदरम्यान डिझेलचे दर 2.30 रुपये प्रतिलिटरने वाढले आहेत. 20 नोव्हेंबरपासून इंधनाच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. तत्पूर्वी 22 सप्टेंबरपर्यंत पेट्रोलचे दर स्थिर होते. तर डिझेलच्या किमतीत 2 ऑक्टोबरपासन कोणताही बदल झालेला नव्हता.

चार शहरांतील पेट्रोल आणि डिझेलचे भाव
इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार, दिल्ली, कोलकाता, मुंबई आणि चेन्नईमध्ये पेट्रोलच्या किमती वाढून क्रमश: 82.66 रुपये, 84.18 रुपये, 89.33 रुपये आणि 85.59 रुपये प्रतिलिटर वाढले आहेत. चार शहरांतील डिझेलच्या किमती वाढून क्रमश: 72.84 रुपये, 76.61 रुपये, 79.42 रुपये आणि 78.24 रुपये प्रतिलिटर झाल्या आहेत.

दररोज 6 वाजता बदलतात किमती
दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत बदल होत असतो. सकाळी सहा वाजता नवे दर लागू केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती एक्साइज ड्युटी, डिलर कमिशन आणि अन्य गोष्टी जोडल्यानंतर त्याचा भाव जवळपास दुप्पट होतो.

असे तपासा पेट्रोल आणि डिझेलचे भाव
आपण एसएमएसच्या माध्यमातून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जाणून घेऊ शकता. पेट्रोल-डिझेलच्या किमती दररोज सकाळी 6 वाजता बदलतात. इंडियन ऑइलच्या वेबासाइटनुसार, RSP बरोबर आपल्या शहराचा कोड टाइप करून 9224992249 नंबरवर SMS पाठवावा लागणार आहे. या शहराचा कोड वेगवेगळा असतो. बीपीसीएल ग्राहक RSP लिहून 9223112222 आणि एचपीसीएल ग्राहक HPPrice लिहून 9222201122 या नंबरवर मेसेज पाठवून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जाणून घेऊ शकतात. (Latest Petrol Diesel Price : Petrol Price Up By 17 Paise and Diesel prices By 19 Paise, Check Rates Here)

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

 

 

Leave a Comment