स्वच्छ इंधन वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी मोदी सरकारने उचलले ‘हे’ नवीन पाऊल, काय आहे ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । स्वच्छ इंधन वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने हायड्रोजन इंधन सेल-आधारित वाहनांच्या (Hydrogen fuel cell-based vehicles) सुरक्षा मूल्यांकन मानकांना अधिसूचित केले आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने बुधवारी केंद्रीय मोटर वाहन अधिनियम 1989 मध्ये दुरुस्ती करून हायड्रोजन इंधन पेशीद्वारे चालविलेल्या मोटार वाहनांच्या सुरक्षिततेचे मूल्यांकन करण्यासाठीच्या निकषांची माहिती दिली आहे.

प्रदूषणामुळे पर्यावरणाचे नुकसानही कमी होईल
मंत्रालयाने याबाबत असे म्हटले आहे की,’ स्वच्छ उर्जेवर चालणाऱ्या वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी ही अधिसूचना जारी करण्यात आली असून त्याअंतर्गत नियमांमध्ये सुधारणा करण्यात आली आहे.’ यासंदर्भात माहिती देताना मंत्रालयाने म्हटले आहे की,’ या पावलामुळे देशातील हायड्रोजन इंधन सेल आधारित वाहनांना चालना मिळण्यास मदत होईल आणि पर्यावरणास अनुकूल अशी उर्जा वापरणार्‍या वाहनांच्या प्रदूषणामुळे पर्यावरणाचे होणारे नुकसान देखील कमी होईल. अशा वाहनांचे उत्पादक आणि पुरवठा करणारे यांच्याकडे वाहन चाचणीसाठी आंतरराष्ट्रीय मानके उपलब्ध केली गेली आहेत.’

व्हेईकल स्क्रॅपिंग पॉलिसी आणण्याची सरकार करत आहे तयारी
यासह जुन्या वाहनांची विल्हेवाट लावण्यासाठी व्हेईकल स्क्रॅपिंग पॉलिसी आणण्याचीही तयारी केंद्र सरकार करीत आहे. या संदर्भात रस्ते आणि परिवहन मंत्रालयाने एक प्रस्ताव सादर केला असून त्यावर मंत्रिमंडळाकडून विचार केला जात आहे. 2018 मध्ये, सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली-एनसीआरमध्ये 10 वर्षापेक्षा जुन्या डिझेल आणि 15 वर्षांपेक्षा जुन्या पेट्रोल वाहनांवर बंदी घातली. तेव्हापासून या पॉलिसीचा विचार केला जात होता. जुन्या वाहनांची विल्हेवाट लावण्याबाबत अद्याप भारतात कोणतेही स्पष्ट अशी वाहनांची पॉलिसी नाही.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
x Close

Like Us On Facebook

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com