RBI चा मोठा निर्णय ! आता बदलणार Paytm आणि Google Pay द्वारे पैसे देण्याचे नियम, त्याविषयी जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । सध्याच्या काळात, मोठ्या दुकानांव्यतिरिक्त चहावाल्यापासून ते दूध आणि भाजी विक्रेत्यां पर्यंत प्रत्येकजण डिजिटल पेमेंटचा आधार घेत आहेत. प्रत्येकाकडे पेटीएम, गुगल पे सारखे अनेक पेमेंटचे पर्याय आहेत. ज्यासाठी आपल्याला फक्त एक क्यूआर कोड स्कॅन करणे आवश्यक असते आणि आपले पेमेंट दिले जाते. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) गुरुवारी एक आदेश जारी करून या पेमेंट सिस्टममध्ये बदल करण्यास सांगितले आहे. चला तर मग ही नवीन सिस्टम काय आहे ते जाणून घेऊयात.

RBI च्या या आदेशानुसार देशात डिजिटल आणि सिक्योर व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी हा मसुदा तयार करण्यात आला आहे. त्यानुसार पेमेंट सिस्टम ऑपरेटर्सना क्यूआर कोड सिस्टममध्ये शिफ्ट करावे लागेल जे इतर पेमेंट ऑपरेटरद्वारे स्कॅन केले जाऊ शकते. या प्रक्रियेच्या अंमलबजावणीची अंतिम तारीख 31 मार्च 2022 निश्चित करण्यात आली आहे.

https://t.co/6CjoDuQClG?amp=1

पेमेंट कंपन्यांना इंटरऑपरेबल क्यूआर कोड वापरणे आवश्यक करण्यासाठी RBI ने एक मसुदा तयार केला आहे. इंटरऑपरेबल क्यूआर कोड म्हणजे कोणताही अॅप असला तरी तो हा क्यूआर स्टिकर सहजपणे वाचू शकतो. सध्या देशात तीन प्रकारचे क्यूआर कोड Bharat QR, UPI QR आणि प्रोपाईटरी क्यूआर कोड आहेत. UPI QR आणि Bharat QR पूर्वीप्रमाणेच सुरू राहील.

इंटरऑपरेबल क्यूआर कोडबद्दल जनजागृती करण्यासाठी पेमेंट सिस्टम ऑपरेटर्सना पाऊले उचलावी लागतील. या इंटरऑपरेबिलिटीमुळे सामान्य लोकं पेमेंट करण्यास सोयीस्कर असतील आणि पेमेंट सिस्टम देखील पूर्वीपेक्षा अधीकच चांगली होईल.RBI ने यासाठी एक नियामक चौकटही (Regulatory Framework) तयार केलेली आहे जेणेकरुन देशात विविध प्रकारच्या पेमेंट सिस्टम ऑपरेट करता येतील.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment