RBI चा मोठा निर्णय! डिसेंबरपासून 24 तास करता येणार मनी लिंक्ड RTGS Service चा वापर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । डिसेंबर महिन्यापासून आपल्याला मोठी रक्कम ट्रान्सफर करण्यासाठी बँक उघडण्याची वाट पाहण्याची आवश्यकता नाही. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने RTGS हे 24 तास चालू ठेवण्याची घोषणा केली आहे. या धोरणानंतर, RBI गव्हर्नर शक्तीकांत दास म्हणाले की, आता फंड ट्रान्सफर RTGS सिस्टिम डिसेंबरपासून चोवीस तास उपलब्ध असेल. RTGS अंतर्गत मिनिमम ट्रान्सफर रक्कम 2 लाख रुपये आहे. RBI ने ही राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर (NEFT) सुविधा गेल्या वर्षीपासून 24 तास सुरू केली.

RTGS म्हणजे काय ते जाणून घ्या
जर आपण पैशाचा व्यवहार करत असाल तर RTGS हा सर्वात वेगवान मार्ग आहे. एखाद्यास पैसे पाठविण्यासाठी NEFT, IMPS सारखे आणखीही बरेच मार्ग आहेत. आपण या पद्धतींद्वारे देखील पैसे ट्रान्सफर करू शकता मात्र यामध्ये आपल्याला जास्त शुल्क द्यावे लागेल आणि NEFT मध्ये आपले पैसे रिअल टाइममध्ये ट्रान्सफर केले जात नाहीत, यासाठी काही वेळ लागू शकेल परंतु RTGS मध्ये रिअल टाइममध्ये पैसे ट्रान्सफर केले जातील. RTGS बद्दल जाणून घेउयात.

RTGS एक फंड ट्रान्सफर सिस्टिम आहे ज्याद्वारे कोणतीही व्यक्ती अगदी सहजपणे एका बँक खात्यातून दुसर्‍या बँक खात्यात पैसे पाठवू किंवा प्राप्त करू शकते. NEFT च्या तुलनेत RTGS प्रणालीद्वारे पैसे त्वरित पाठविले किंवा प्राप्त केले जाऊ शकतात. रीअल टाईम म्हणजे आपण पैसे पाठवताच त्याची प्रक्रिया त्वरित सुरू होते आणि Gross Settlement म्हणजे One on One बेसिस वर सेटलमेंट होते.

RTGS मधून किती पैसे ट्रान्सफर केले जाऊ शकतात
2 लाख किंवा त्याहून अधिकची रक्कम प्रामुख्याने RTGS मधून ट्रान्सफर केली जाऊ शकते. यासाठी खास वेळ निश्चित केलेला आहे. RTGS चे व्ययस्थापन करणार्‍या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) अलीकडेच RTGS ट्रान्सफरची वेळ ही दीड तासांपर्यंत वाढविली.

सध्या RTGS ची वेळ –
मागील वर्षी RTGS ची वेळ संध्याकाळी 4.30 ने वाढवून 6.00 करण्याचा निर्णय घेण्यात आला. RBI च्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार

सकाळी 9.00 वाजता सुरुवात होते.
संध्याकाळी 18.00 पर्यंत ग्राहकांचे ट्रान्सझॅक्शन
रात्री 19.45 पर्यंत इंटर-बँक ट्रान्सझॅक्शन
20.00 वाजता समाप्त

सरकारी मालकीच्या स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) पासून ते खासगी क्षेत्रातील आयसीआयसीआय बँक आणि एचडीएफसी बँकेसह अनेक व्यावसायिक बँकां या RTGS पेमेंट सिस्टमचे मेंबर आहेत.

वेळानुसार आरटीजीएस चार्जेस खालीलप्रमाणे आहेत
वेळ आणि शुल्क
सकाळी 8 AM ते सकाळी 11 AM शून्य रुपये
दुपारी 11 AM ते दुपारी 13 PM 2 रुपये
दुपारी 13 PM ते संध्याकाळी 18 PM 5 रुपये
संध्याकाळी 18 PM नंतर 10 रुपये

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment