रोहित पवारांनी केंद्र सरकारला हात जोडून केली ‘ही’ विनंती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संचारबंदीमुळे मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढली आहे. देशातील लाखो नागरिकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. देशातील नागरिक रोजगाराच्या चिंतेत आहेत. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी यासंदर्भात एक ट्विट केले असून त्यांनी मनरेगासारख्या योजना ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही भागात राबविण्याची विनंती त्यांनी केली आहे. त्यांनी या ट्विट मध्ये सरकारला हात जोडून विनंती आहे असे म्हंटले आहे. त्यांनी काही ट्विट मधून मनरेगाच्या तरतुदीचे कौतुक केले आहे तसेच अशा योजना राबविल्या जाव्यात यासाठी विनंती केली आहे.

‘देशात बेरोजगारी प्रचंड वाढलीय. कष्ट करण्याची तयारी असूनही असंघटित क्षेत्रातील लोकांच्या हाताला काम नाही. असे अनेकजण गेल्या महिन्यापासून मला फोन करतायेत. त्यामुळे माझी केंद्र सरकारला हात जोडून विनंती आहे, ग्रामीण व शहरी या दोन्ही भागात ‘मनरेगा’सारखी योजना तातडीने राबवा.’ असे ट्विट पवारांनी केले आहे. ‘मनरेगा’साठी अतिरिक्त ४० हजार कोटी ची तरतूद केली हा चांगला निर्णय आहे.यामुळे ग्रामीण भागातील व शहरातून गावाकडे आलेल्या लोकांच्या हाताला काम मिळण्यास काही प्रमाणात सहकार्य होईल. अशाचप्रकारे ग्रामीण व शहरी लोकांच्या हाताला काम मिळेल व बाजारात मागणी वाढेल, असे निर्णय घ्यावे लागतील.’ असेही त्यांनी सुचविले आहे.

विविध कर्जाच्या व्याजावर सवलत द्यावी. त्यामुळे प्रत्यक्ष आर्थिक मदतीमुळे क्रयशक्ती वाढून मागणी वाढेल व अर्थव्यवस्थाही गती घेईल. तसेच या निमित्ताने मेकइनइंडिया ची राहिलेली अंमलबजावणीही आपल्याला प्रभावीपणे करता येईल. असे पवार यांनी सांगितले आहे. आर्थिक मंदी व कोरोनामुळे निर्माण झालेली आजची परिस्थिती यात खूप मोठा फरक आहे. मंदीत थोडं-फार तरी उत्पन्न मिळत असतं, पण आज सगळंच ठप्प आहे. त्यामुळे यात केंद्र सरकारची भूमिका महत्त्वाची ठरते. याशिवाय मागणी वाढण्यासाठी खासगी आणि सरकारी गुंतवणूक वाढणे आवश्यक आहे. असे त्यांनी सांगितले आहे. बेरोजगारी कमी करण्याच्या दृष्टीने पवार कार्यरत असल्याचे दिसून येत आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment