‘या’ खात्यात पैसे नसतानाही काढता येतात ५ हजार रुपये; मिळतो १.५० लाखांचा ‘हा’ फायदा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान जन धन खाते ही मोदी सरकारची सर्वात महत्वाकांक्षी योजना आहे. आर्थिक समावेशाव्यतिरिक्त, केंद्र सरकारच्या या योजनेचे आणखीही बरेच फायदे आहेत. मात्र, बहुतेक खातेदारांना हे ठाऊकही नाही आहे की त्यांना पंतप्रधान जनधन खात्यात 5000 रुपयांची ओव्हरड्राफ्टची सुविधा मिळते. यासाठी अशी अट आहे की PMJDY अकाउंट आधार कार्डशी लिंक केलेले असले पाहिजे.

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की जर कोणतेही पंतप्रधान जनधन खाते आधार कार्डशी जोडले गेले नाही तर त्या खात्यावर या ओव्हरड्राफ्टच्या सुविधेचा लाभ मिळणार नाही. या ओव्हरड्राफ्टच्या सुविधेअंतर्गत खातेदार त्याच्या खात्यात पैसे नसतानाही आपल्या बँक खात्यातून पैसे काढू शकतात.

ही अट पूर्ण केल्यानंतर मिळते ओव्हरड्राफ्टची सुविधा
याची माहिती असनाऱ्या तज्ञाचे असे म्हणणे आहे की या ओव्हरड्राफ्टच्या सुविधेचा लाभ घेण्यासाठी खातेधारकाला पहिल्या ६ महिन्यांपर्यंत ते चालू ठेवावे लागेल. यासाठी त्यांना त्यांच्या खात्यावर पुरेसे पैसे ठेवावे लागतील आणि या कालावधीत त्यांनी वेळोवेळी या खात्यावर ट्रान्सझॅक्शनही करावे लागेल. अशा खातेदारांना रुपे डेबिट कार्ड दिले जाते, जे या व्यवहारासाठी सहज वापरता येते.

संबंधित बँकेला हे खाते योग्य वाटल्यास या खातेधारकास ५,००० रुपयांपर्यंतच्या ओव्हरड्राफ्टची सुविधा मिळते. मात्र यासाठी त्यांचे खाते हे आधार कार्डाशी लिंक असणे आवश्यक आहे. मात्र, काही बाबतीत ओव्हरड्राफ्टची ही सुविधा अंशतः व्याज दिल्यास उपलब्ध होते.

अपघाती विमा सुविधा
अशा परिस्थितीत जर पंतप्रधान जन धन खाते आधारशी जोडले गेले नाही तर त्यांना या सुविधेचा लाभ मिळणार नाही. या पंतप्रधान जन धन खात्याअंतर्गत देण्यात आलेल्या रुपे डेबिट कार्डावर खातेधारकाला एक लाख रुपयांचा अपघाती विमा देखील मिळतो. तसेच या खात्यात किमान रक्कम राखण्याची चिंताही नाही आहे. मात्र, जर हे खाते आपल्या आधार कार्डाशी जोडलेले नसेल तर नॉमिनीला वरील अपघाती विम्याचा लाभ मिळणार नाही.

१.३० लाख रुपयांचा लाभ
तसेच या अपघाती विमा व्यतिरिक्त, रुपे डेबिट कार्ड वर खाते धारकाच्या जर अपघातामुळे मृत्यू झाल्यास ३०,००० रुपयांचा विमा संरक्षण मिळते. अशाप्रकारे, एखाद्या खाते धारकाचा जर अपघातामुळे मृत्यू झाल्यास, नॉमिनी व्यक्तीला एकूण १.३० लाख रुपयांचा लाभही मिळू शकेल.

जन धन खाते कसे आणि कुठे उघडले जाईल हे जाणून घेऊयात
देशातील प्रत्येक नागरिकास बँकिंगशी जोडण्यासाठी पंतप्रधान जन-धन योजना सुरू केली गेली आहे. याचा हेतू बँकिंग मध्ये अशा लोकांना आणायचे आहे, जे अजूनही त्यातून बाहेर आहेत. आपण कोणत्याही बँकेच्या शाखेत जाऊन जन-धन खाते उघडू शकता.यामध्ये आपल्याला कोणतीही मिन‍िमम बॅलन्स राखण्याची अट नाही आहे.

कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे
जन-धन खाते उघडण्यासाठी, आधार कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्ससह नो युअर कस्टमर (KYC) ची पूर्तता करणारे डॉक्युमेंट आपण सबमिट करू शकता. आपल्याकडे डॉक्युमेंट नसल्यास आपण एक स्मॉल अकाउंट उघडू शकता. यामध्ये तुम्हाला सेल्फ अटेस्टेड फोटो आणि तुमची सही बँक अधिकाऱ्यासमोर भरावी लागेल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment