SBI ने ४० करोड ग्राहकांना केले अलर्ट, ‘या’ फेक वेबसाईट पासून रहा सावधान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या ४४ कोटी खातेदारांना सायबर क्राईमबद्दल सावधानता बाळगण्याचे आवाहन केले आहे.एसबीआयने मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरवर पोस्ट केले आणि म्हटले आहे की, फसवणूक करणारे नवीन पद्धती आणि तंत्रज्ञानाचा वापर करून लोकांना फसवत आहेत.एसबीआयने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की,फसवणूक करणारे सायबर क्राइम करण्यासाठी नवीन पद्धती आणि तंत्रे वापरत आहेत. भारतात आता या नव्या मार्गाने लोकांची फसवणूक केली जात आहे. त्याआधी ईएमआयमध्ये देण्यात आलेल्या सवलतीचा फायदा घेणाऱ्या ठगांविषयी बँकेने ग्राहकांना सतर्क केले आहे. बँकांनी ग्राहकांना ओटीपी आणि पिन सारखी संवेदनशील माहिती इतर कोणाकडेही उघड करण्यास टाळायला सांगितले आहे.

एसएमएसद्वारे लोकांना लावत आहेत चूना
एसबीआयने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, फसवणूक करणारे लोक फसवणूकीसाठी एसएमएस पाठवत आहेत. या एसएमएसमध्ये एसबीआय नेटबँकिंग पेजेससारखे दिसणारी पेजेस पाठविले जात आहेत. आपल्याला असा एसएमएस प्राप्त झाल्यास तो त्वरित डिलीट करावा.आपल्याला आपला पासवर्ड किंवा खात्याची माहिती अपडेट करण्यास सांगण्यात येईल त्यामुळे या सापळ्यात आपण अडकू नये. http://www.onlinesbi.digital हि एक बनावट वेबसाइट आहे.

बँकेने म्हटले आहे की, तुम्हालाही असे मेसेजेस येत असल्यास कृपया आम्हाला [email protected] आणि [email protected] वर ईमेल करा व त्याबद्दल आम्हाला सांगा. याशिवाय cybercrime.gov.in/Default.aspx वर आपला रिपोर्ट करू शकता.

या सेफ्टी टिप्सचे अनुसरण करा-
>> कोरोना विषाणूमुळे लॉकडाऊन परिस्थितीत फसवणूक करणारेही सक्रिय झाले असून फसवणूक यूपीआय आयडीमधून देणगी मागितली जात आहे. बँक म्हणाले, फसव्या यूपीआय आयडींकडून देणगी मागणाऱ्यांपासून सावध रहा. आपल्या कष्टाने मिळवलेले पैसे देण्यापूर्वी विचार करा.

>> निधी हस्तांतरित करण्यापूर्वी पैसे घेणार्‍याची ओळख तपासा.

>> कोणत्याही ई-कॉमर्स साइटवर तुमच्या कार्डचा तपशील कधीही सेव्ह करु नका.

>> अनावश्यक ईमेलवर आपली संवेदनशील माहिती देऊ नका.

>> कोरोना विषाणूशी संबंधित कोणतीही बातमी त्यावर क्लिक करण्यापूर्वी तपासा.

>> विश्वसनीय स्त्रोताकडून खात्री करून घ्या.

> जेव्हा आपण घोटाळा पाहता तेव्हा त्याचा रिपोर्ट करा.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews”

इतर महत्वाच्या बातम्या –

लॉकडाउन संदर्भात केंद्राची नवी नियमावली, जाणून घ्या काय सुरु राहणार अन काय बंद

काय आहे वटवाघूळ अन् कोरोनाचं कनेक्शन? ICMR चा हा रिपोर्ट वाचून बसेल धक्का

लाॅकडाउन वाढल्याने ६ महिने वाढू शकते EMI मधील सूट, घ्या जाणुन

आता ८ एवजी १२ तासांची होणार कामाची शिफ्ट? कायद्यात होणार सुधारणा

पुन्हा वाढल्या सोन्या चांदीच्या किंमती, जाणुन घ्या आजचे भाव

भारताच्या वाटेवर असलेलं मेडिकल किटने भरलेले जहाज अमेरिकेला का पाठवले? WHO म्हणते…

Leave a Comment