दसरा आणि दिवाळीसाठी SBI ची सर्वात मोठी ऑफर, आता 0.25 टक्के स्वस्त दराने मिळणार होम लोन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । उत्सवाच्या निमित्ताने घर विकत घेतलेल्या लोकांना अधिक आनंद मिळावा यासाठी देशातील सर्वात मोठी सरकारी स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI-State Bank of India) गृह कर्जाचा दर 0.25 टक्क्यांपर्यंत सवलत देण्याचे जाहीर केले आहे. SBI च्या होम लोन ग्राहकांना 75 लाख रुपयांपर्यंतचे स्वप्नवत घर खरेदी करण्यासाठी 0.25% व्याज सवलत मिळेल. ही सूट सिबिल स्कोअरच्या आधारे आणि योनोद्वारे अर्ज केल्यावर उपलब्ध असेल. नुकत्याच जाहीर झालेल्या फेस्टिव्हल ऑफरच्या घोषणेनुसार SBI देशभरात 30 लाख ते 2 कोटी रुपयांच्या गृह कर्जावरील क्रेडिट स्कोरच्या आधारे 0.10 टक्के ते 0.20 टक्के सवलत देईल. देशातील आठ महानगरांमध्ये तीन कोटी रुपयांपर्यंत घर घेणाऱ्या ग्राहकांनाही अशीच सवलत मिळणार आहे. योनोमार्फत अर्ज केल्यास सर्व गृह कर्जासाठी 0.05 टक्के अतिरिक्त सवलत मिळेल.

30 लाख रुपयांची स्वस्त गृह कर्जे – SBI आता 30 लाख रुपयांपर्यंतच्या गृह कर्जासाठी 6.90 टक्क्यांपर्यंत सर्वात कमी व्याज दर देते आहे. 30 लाख रुपयांपेक्षा जास्त गृह कर्जासाठीचे व्याज 7 टक्के असेल.

SBI चे एमडी (रिटेल आणि डिजिटल बँकिंग) सीएस शेट्टी म्हणाले, “आम्ही आमच्या संभाव्य गृहकर्ज ग्राहकांना या सणाच्या हंगामात अतिरिक्त सवलती जाहीर केल्याने आम्हाला आनंद झाला आहे. एसबीआय कडून गृहकर्जांवरील सर्वात कमी व्याजदराच्या ऑफरसह, आमचा विश्वास आहे की, हे पाऊल घर खरेदी करण्यास इच्छुकांना त्यांच्या स्वप्नातील घराची योजना करण्यास मदत करेल.

सीएस शेट्टी म्हणाले की, कोविडनंतरच्या काळात आपल्याकडे ग्राहकांकडून मागणी वाढत आहे आणि हे लक्षात घेता आम्ही एसबीआयच्या ग्राहकांच्या गरजा आवश्यकता याबद्दल आकर्षक आणि फायदेशीर ऑफर देत राहू.

SBI ची मोठी ऑफर-

(1) 75 लाख रुपयांच्या कर्जासाठी सिबिल स्कोअरच्या आधारे 0.20 पर्यंत व्याज सवलत

(2) रिझर्व्ह बॅंकेचे आर्थिक धोरण जाहीर झाल्यानंतर बँक दरांमध्ये सवलत देईल

(3) एसबीआय YONO app द्वारे अर्जावर सर्व प्रकारच्या गृह कर्जात अतिरिक्त 0.05% सवलत

(4) 30 लाख ते 75 लाख रुपयांच्या कर्जासाठी ग्राहकांना क्रेडिट स्कोअर आधारित 0.10 टक्क्यांपर्यंत सवलत मिळेल.

(5) घरे विकत घेणाऱ्या महिलांना 0.05 टक्के अतिरिक्त सवलत.

(6) 30 लाख रुपयांपर्यंतच्या गृह कर्जासाठी सर्वात कमी व्याज दर 6.90% पासून सुरु.

सणांच्या निमित्ताने ऑफर्सचा पाऊस – स्टेट बँक ऑफ इंडियाने आधीच आपल्या किरकोळ ग्राहकांना मोटारी, सोने, वैयक्तिक कर्जावरील प्रोसेसिंग फीवर 100% सवलत असणार्‍या विशेष ऑफर्स जाहीर केल्या आहेत. किरकोळ ग्राहक 7.5 टक्के दराने सुरू असलेल्या कार कर्जावरील सर्वात कमी व्याजदराचा फायदा घेत आहेत.

या उत्सवाच्या हंगामात सोन्याचे कर्ज आणि वैयक्तिक कर्ज ग्राहक अनुक्रमे 7.5 टक्के आणि 9.6 टक्के व्याजदर उपभोगत आहेत. पेपरलेस पूर्व-मान्यताप्राप्त वैयक्तिक कर्ज आणि इन्स्टो होम टॉप-अप कर्जेही तुम्ही काही क्लिक्सद्वारे योनोमार्फत घेऊ शकता.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment