अबब!!! साईचरणी वर्षभरात २८७ कोटींहून अधिक रकमेचे दान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अहमदनगर । शिर्डीच्या साई चरणी २०१९ मध्ये तब्बल २८७ कोटींहून अधिक रकमेचे दान प्राप्त झाले आहे. ऑनलाइन, डेबीट व क्रेडीट कार्डच्या माध्यमातून सदर देणग्या देण्यात आलेत. जानेवारी ते डिसेंबर २०१८ या वर्षापेक्षा २०१९ या वर्षात यंदा साई चरणी अर्पण करण्यात आलेल्या देणगीमध्ये दोन कोटी रुपयांनी वाढ झाली आहे.

यामध्ये दक्षिणा पेटीत १५६ कोटी ४९ लाख २ हजार ३५० रुपयांच गुप्तदानही करण्यात आलं आहे. त्याशिवाय देणगी खिडकीवर ६० कोटी ८४ लाख ८ हजार ५९० रुपयांच दान करण्यात आलं आहे. तर, चेक आणि डीडीच्या स्वरुपात २३ कोटी ३५ लाख ९० हजार ४०९ रुपये दान म्हणून देण्यात आले आहेत.

साई संस्थानचे आर्थिक वर्ष हे एप्रिल ते मार्च असे असते. परंतु अनेकांना जानेवारी ते डिसेंबर या कॅलेंडर वर्षात साई संस्थानला किती दान आले, याची उत्सुकता असते. गेल्या कॅलेंडर वर्षाचा विचार केल्यास २०१८ मध्ये साई चरणी २८५ कोटी रुपयांचे दान आले होते. यंदा मात्र यामध्ये वाढ झाली असून २०१९ मध्ये साईबाबांच्या चरणी २८७ कोटी ६ लाख ८५ हजार ४१५ रुपये दान आले आहेत. याशिवाय यावर्षी १९ किलो सोने आणि तब्बल ३९१ किलो चांदीही प्राप्त झाली आहे.

हे पण वाचा –

मंत्रिपद न मिळाल्याने शिवसेनेचे ‘हे’ ६ आमदार नाराज, सामनातूनही नाराजीचा सूर

मुख्यमंत्री शिवसेनेचा मात्र सत्तेचा रिमोट शरद पवारांच्याच हातात

शरद पवारांचे धक्कातंत्र, गृह खाते विदर्भाला?

हे जनतेचे नव्हे, पिता पुत्राचे सरकार – सुधीर मुनगंटीवार

वाघासारखी डरकाळी फोडणारी शिवसेना बकरी सारखी झाली – रामदास आठवले

अजित दादा म्हणजे सर्वपक्षीय उपमुख्यमंत्री !

देशाच्या लष्करप्रमुखपदी मराठी माणूस! मनोज नरवणे यांनी स्वीकारला पदभार

Leave a Comment