निराशाजनक! १६ लाख रोजगाराच्या संधी होणार कमी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई | देशात बेरोजगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असताना आता यंदाच्या वर्षी १६ लाख रोजगाराच्या संधी कमी होणार असल्याचे समोर आले आहे. बेरोजगारांमध्ये यामुळे चिंतेचे वातावरण असून याचा अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम पडण्याची शक्यता आहे.

स्टेट बँक आॅफ इंडियाने केलेल्या एका पाहणीतून सदर माहिती समोर आली आहे. यंदाच्या वर्षी १६ लाख रोजगाराच्या संधी कमी होणार असल्याचे स्टेट बँक आॅफ इंडियाचा अहवाल म्हटले आहे. यामुळे तरुणांमध्ये निराशाजनक वातावरण बनले आहे.

दरम्यान केंद्र व राज्य सरकारच्या अखत्यारातील नोकर्‍यांमध्येही घट होणार असून २०२० या वर्षात एकुण १६ लाख रोजगार संधी कमी होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Leave a Comment