SpiceJet करणार कोरोना लसीचे वितरण, या भारतीय विमान कंपनीने केली 17 कार्गो एयरक्राफ्टची निर्मिती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । भारतासह संपूर्ण जग आज कोरोना लस (Covid-19 vaccine) ची आतुरतेने वाट पाहत आहे. जगातील कोरोना लस तयार आणि उत्पादन करण्याच्या योग्य त्या धोरणावर काम केले जात आहे. पण या सर्वांच्या बाबतीत भारतासह संपूर्ण जगासमोर एक मोठे आव्हान आहे. देशातील खासगी विमान कंपनी स्पाइसजेट (SpiceJet) कोविड लसीच्या आंतरराष्ट्रीय वितरण मोहिमेमध्ये सहभागी होणार आहे. स्पाइस जेटने कोरोना लसीला लॉजिस्टिक सपोर्ट देण्याची घोषणा केली आहे.

कोरोना लसीचे ट्रांसपोर्टेशन करणे हे एक मोठे आव्हान आहे
कोरोना लसीची तिसरी चाचणी अनेक देशांमध्ये यशस्वी झाली आहे, तसेच अनेक देशांमध्ये दुसर्‍या आणि तिसर्‍या टप्प्यातील चाचण्या अजूनही चालूच आहेत. अशा परिस्थितीत देश आणि जगाच्या अनेक औषध कंपन्या कोरोनावरील लस तयार करण्यासाठी तयार आहेत. अनेक अभ्यासाच्या अहवालांच्या आधारे हे उघडकीस आले आहे की, कोरोनाची लस केवळ एका विशिष्ट तापमानातच ठेवून त्याचे ट्रांसपोर्टेशन करावे लागते. देशातील सर्वात मोठी खासगी विमान कंपनी असलेल्या स्पाइस जेटने असे कार्गों एयरक्राफ्ट स्पाइस एक्सप्रेस (Spice Express) तयार केले आहे ज्यामध्ये तापमान -40 डिग्री ते +25 डिग्री पर्यंत व्यवस्थापित केले जाऊ शकते. या तयारीमुळे कोरोनाची लस केवळ देशाच्या निरनिराळ्या भागांतच पोहोचविली जाऊ शकत नाही तर जगातील वेगवेगळ्या देशांमध्ये नेणेही सोपे होऊन जाईल.

स्पाइस जेट तयार केले 17 कार्गो एयरक्राफ्ट
देश आणि जगभरात कोरोना लस सुरक्षितपणे पोचविण्यासाठी स्पाइस जेटने 17 कार्गो एयरक्राफ्ट रचना केली आहे. ज्यामध्ये तापमान व्यवस्थापित केले जाऊ शकते. इतकेच नाही तर मार्चमध्ये लॉकडाऊननंतर म्हणजेच कोरोना कालावधीत स्पाइस जेटचीही आवश्यक वस्तू गंतव्यस्थानात नेण्यात मोठी भूमिका होती. ही खासगी विमानसेवा देशाच्या विविध भागात आवश्यक वस्तू पुरविते एवढेच नव्हे तर जगातील 50 हून अधिक देशांपर्यंत वस्तू पोचविण्यातही मोठी भूमिका बजावत आहे.

यूएसए, ब्रिटन, जर्मनी, फ्रान्स, रशिया, उझबेकिस्तान, युएई, सौदी अरेबिया, थायलँड, चीन, म्यानमार, जपान, मलेशिया, सिंगापूर आणि कॅनडा या 50 हून अधिक देशांमध्ये 85 हजार टन अत्यावश्यक वस्तूंची वाहतूक या विमान कंपनीमार्फत केली जात आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment