‘एलबीटी’ पोटी सांगली मनपाला दिले जाणारे अनुदान सरकारने थांबवले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी । राज्य सरकारने ‘एलबीटी’च्या नुकसान भरपाईपोटी दिले जाणारे स्थानिक स्वराज्य संस्थाचे अनुदानही थांबवले असल्याचे वृत्त समोर आले आहे. यामुळे सांगली महापालिकेला एक तारखेच्या आत जमा होणारे १२ कोटी ६९ लाख रुपयाचे एलबीटीचे अनुदान दहा तारीख ओलांडली तरी न आल्याने कर्मचार्‍यांचे पगार थांबले आहेत. दरम्यान महापालिका प्रशासनाने घरपट्टी वसूलीतून देण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. कर्मचार्‍यांचे पगार थकल्याने कर्जाच्या हप्त्याचे संकट निर्माण झाले आहे. सध्या ‘एलबीटी’चे अनुदान आले नाही तर महापालिकेसमोर एलबीटी कर वसुली करण्याशिवाय पर्याय राहणार नाही अशी परिस्थिती आहे.

दरम्यान राज्यात सत्तांतर झाले. सेना, राष्ट्रवादी, काँग्रेस अशी आघाडीची सत्ता राज्यात आली. मात्र अद्याप देखील मंत्रीमंडळाचा विस्तार झाला नाही.  यामुळे अर्थमंत्री राज्याला नसल्याने पुढील आर्थिक निर्णय घ्यायला मंत्रालय तयार नाही. या गोंधळात सांगली महापालिकेला मिळणारे एलबीटी पोटीचे १२ कोटी ६१ लाखाचे अनुदान अद्याप आलेले नाही. एक तारखेला मिळणारे अनुदान दहा तारखी ओलांडली तरी न आल्याने महापालिका प्रशासन हडबडले आहे. घरपट्टी,पाणीपट्टी अपवाद सोडता उत्पन्नाचे स्त्रोत नसल्याने पगार तरी होणार का? असा सवाल कर्मचारी उपस्थित करीत आहेत.

Leave a Comment