मोठी बातमी! सुप्रीम कोर्टानं BS-IV श्रेणीतील वाहनांच्या नोंदणीवर घातली बंदी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी BS-IV श्रेणीतील नव्या वाहनांची नोंदणी स्थगित करण्याचे आदेश दिले. न्यायालयाचा पुढील आदेश येईपर्यंत ही बंदी कायम राहील. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने मार्च महिन्यात लॉकडाऊननंतर BS-IV वाहनांच्या मोठ्याप्रमाणावर झालेल्या विक्रीबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. लॉकडाऊनच्या काळात BS-IV श्रेणीतील वाहनांच्या विक्रीत प्रचंड वाढ झाल्याचे निरीक्षण यावेळी न्यायालयाने नोंदवले. आता याप्रकरणाची पुढील सुनावणी १३ ऑगस्ट रोजी होणार आहे. “झी २४” वृत्तवाहिनीनं एएनआयच्या हवाल्याने याबाबतचे वृत्त दिलं आहे.

यापूर्वी न्यायालयाने BS-IV श्रेणीतील वाहनांची विक्री ३१ मार्च २०२० पासून बंद करण्याचे आदेश दिले होते. मात्र, २४ मार्च रोजी देशभरात लॉकडाऊन करण्यात आल्यानंतर ऑटोमोबाईल डिलर्स असोसिएशनने BS-IV वाहनांच्या विक्रीसाठी मुदत वाढवून देण्याची विनंती न्यायालयाला केली होती. त्यानुसार २४ मार्चपासून सुरु झालेला लॉकडाऊन संपल्यानंतर पुढील १० दिवसांत BS-IV श्रेणीतील उर्वरित वाहने विकण्यास सर्वोच्च न्यायालयाने मुभा दिली होती. तसेच या वाहनांची नोंदणी करण्याचा कालावधीही वाढवण्यात आला होता.

मात्र, या अतिरिक्त कालावधीत BS-IV श्रेणीतील वाहनांची नेहमीपेक्षा जास्त विक्री झाली. त्यामुळे आता न्यायालयाने या नव्या वाहनांच्या नोंदणीवर सरसकट बंदी आणण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता नवीन वाहन खरेदी केलेल्या BS-IV श्रेणीतील वाहनधारकांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment