‘ही’ कंपनी 4% पेक्षा कमी दरावर देत आहे Home Loan ऑफर, सोबत मिळणार 25,000 ते 8 लाखांपर्यंतचे व्हाउचर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सणासुदीच्या हंगामात एकामागून एक बँका होम आणि ऑटो लोनवरील व्याज दर कमी करत आहेत. जर आपणही घर किंवा वाहन खरेदी करण्याचा विचार करीत असाल तर ही चांगली संधी आहे कारण सणासुदीच्या हंगामात बर्‍याच बँका स्वस्त दरात कर्ज उपलब्ध करून देत आहेत. या सर्वांमध्ये टाटा हाऊसिंगने एक योजना जाहीर केली आहे. रिअल इस्टेट क्षेत्राला दिलासा देण्यासाठी सरकारने आणि RBI ने बरीच पावले उचलली आहेत.

टाटा हाऊसिंग होम लोन – टाटा हाउसिंगच्या या योजनेंतर्गत गृह खरेदीदारांना एका वर्षासाठी होमलोनवर केवळ 3.99 टक्के व्याज दर द्यावे लागतील. संभाव्य ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी उर्वरित खर्च कंपनी स्वतःच करेल. 20 नोव्हेंबरपर्यंत ही योजना 10 प्रोजेक्‍टसाठी व्हॅलिड आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार बुकिंगनंतर प्रॉपर्टी नुसार 25,000 ते आठ लाख रुपयांपर्यंतचे गिफ्ट व्हाउचर ग्राहकांना मिळतील. दहा टक्के भरल्यानंतर व प्रॉपर्टी रजिस्ट्रेशन नंतर व्हाउचर देण्यात येईल.

या सणासुदीच्या हंगामात भारतीय स्टेट बँक आणि एचडीएफसी बँक स्वस्त होम आणि ऑटो लोनच्या ऑफर घेऊन आल्या आहेत. RBI ने अलिकडच्या काही महिन्यांत रेपो दरात कपात केली होती. त्या आधारे बँका आपल्या ग्राहकांना स्वस्त कर्ज घेण्यासाठी सुवर्णसंधी देत ​​आहेत.

उर्वरित बँकांचे दर – बँक ऑफ इंडिया आणि सेंट्रल बँक ऑफ इंडिया 75 लाख रुपयांच्या 20 वर्षांसाठीच्या गृहकर्जावर 6.85 टक्के व्याज दराने कर्ज देत आहेत. यानंतर, कॅनरा बँक आणि पंजाब आणि सिंध बँक दोन्हीही 6.90 टक्के व्याज दराने 75 लाख रुपयांचे कर्ज देत आहेत. त्याचवेळी SBI 7.20 टक्के व्याजदराने कर्जाची ऑफर देत आहे. एचडीएफसी लिमिटेड आणि एलआयसी हाउसिंग फायनान्स 75 लाख रुपयांच्या गृह कर्जावर 7 टक्के व्याज आकारत आहेत.

कोटक महिंद्रा बँकेचे होम लोन दर – या व्यतिरिक्त कोटक महिंद्रा बँक स्वस्त होम लोन, लोन प्रोसेसिंग फीस माफी, ऍग्री आणि रिटेल लोन ऑनलाइन देत आहे. कोटक महिंद्राने होम लोनवरील व्याजदर 7 टक्क्यांपर्यंत कमी केले. होम लोन वार्षिक 7 टक्के दराने सुरू होते, असे बँकेने म्हटले आहे. कार लोन, टू व्हीलर लोन आणि शेती, व्यावसायिक वाहनांशी संबंधित व्यवसाय या पैशावर बँक प्रोसेसिंग फीस माफ करीत आहे. जर कर्जदार दुसर्‍या बँकेतून स्विच करत असेल तर बँक त्या ग्राहकालाही बराच फायदा देत आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment