सोन्याचे भाव पुन्हा वाढले, चांदी गेली 75 हजार रुपयांच्या पुढे; जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आंतरराष्ट्रीय स्तरावर किंमतींच्या जोरदार वाढीमुळे देशांतर्गत बाजारात सोन्याच्या किंमतीत पुन्हा वाढ झाली आहे. गुरुवारी राष्ट्रीय राजधानी दिल्लीत सोन्याच्या किंमतीत प्रति 10 ग्रॅम 225 रुपयांची वाढ झाली. सोन्याप्रमाणेच चांदीचे दरही वाढले आहेत. एक किलो चांदीच्या किंमती या 1,932 रुपयांनी वाढल्या. तज्ज्ञांचे याबाबत असे म्हणणे आहे की, कमकुवत डॉलर, मध्यवर्ती बँकांकडून प्रोत्साहनात्मक उपाय आणि वाढत्या कोरोना विषाणूच्या घटनांमुळे सोन्याच्या सुरक्षित गुंतवणूकीत वाढ झाली आहे. नैसर्गिक आपत्ती, साथीचे रोग आणि राजकीय तणावात सोन्यात गुंतवणूक करणे सुरक्षित मानले जाते.

सोन्याचे नवीन दर
गुरुवारी, दिल्ली सराफा बाजारात 99.9 टक्के शुद्धतेच्या सोन्याची किंमत ही प्रति 10 ग्रॅम 56,590 रुपये इतकी उच्चांकी पातळीवर पोहोचली आहे. यापूर्वी बुधवारी ते प्रति दहा ग्रॅम 56,365 रुपयांवर बंद झाले होते. यावेळी सोन्यातील ही सर्वात मोठी वाढ प्रति 10 ग्रॅम 225 रुपये नोंदली गेली. आंतरराष्ट्रीय बाजारात सोने हे प्रति औंस 2,045.70 डॉलर होते.

चांदीचे नवीन दर
गुरुवारी दिल्लीत एक किलो चांदीची किंमत 73,823 रुपयांवरून 75,755 रुपयांवर गेली आहे. या काळात चांदीच्या किंमतींमध्ये 1,932 रुपयांची जोरदार वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीचा भाव प्रति औंस 27.57 डॉलर होता.

सोन्या-चांदीचे भाव का वाढले?
एचडीएफसी सिक्युरिटीजचे सीनियर एनालिस्ट (कमोडिटीज) तपन पटेल म्हणाले की, आंतरराष्ट्रीय स्तरावरील किंमतींच्या प्रचंड वाढीमुळे दिल्लीतील 24 कॅरेट सोन्याच्या स्पॉटची किंमत ही 225 रुपयांनी वाढली. आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याच्या किमतीत 2,045.70 डॉलर प्रति औंस झाली. त्याच वेळी चांदीची किंमत ही प्रति औंस 27.57 डॉलर होती.

रिलायन्स सिक्युरिटीजचे ज्येष्ठ संशोधन विश्लेषक श्रीराम अय्यर यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना विषाणूच्या साथीमुळे जागतिक अर्थव्यवस्थेतील रिकव्हरी विषयी वाढलेल्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनी खरेदी केल्यामुळे सोने आणि चांदीच्या किंमती गुरुवारी आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढल्या.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment