जन्माष्टमीनिमित्त सोने 1317 रुपयांनी तर चांदी 2943 रुपयांनी घसरली; जाणून घ्या आजचे दर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोन्या-चांदीच्या किंमतीत सातत्याने होणारी वाढ आता थांबलेली आहे. मंगळवारी सोन्याच्या किंमतीत मोठीच घसरण झाली. मंगळवारी दिल्ली बुलियन मार्केटमधील सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅम 1,317 रुपयांनी स्वस्त झाला आहे. त्याच वेळी, एक किलो चांदीची किंमत ही 2,943 रुपयांनी कमी झाली. रुपयाच्या मजबुतीमुळे स्थानिक बाजारपेठेत सोन्याच्या किंमती खाली आल्या असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. सोन्याच्या किंमती येत्या काही दिवसांत आणखी घसरतील.

सोन्याचे नवे दर
मंगळवारी दिल्ली बुलियन मार्केटमधील 99.9 टक्के शुद्धतेच्या सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 56,080 रुपये वरून 54,763 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​आली आहे. या काळात प्रति 10 ग्रॅमच्या किमतींमध्ये 1,317 रुपयांनी घट झाली आहे. त्याचबरोबर मुंबईतील 99.9 टक्के शुद्धतेच्या सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 54528 रुपयांवर आली आहे.

चांदीचे नवे दर
मंगळवारी सोन्याप्रमाणे चांदीच्या भावातही मोठी घसरण झाली आहे. दिल्लीत एक किलो चांदीची किंमत 76,543 रुपयांवरुन 73,600 रुपयांवर आली आहे. या कालावधीत चांदीच्या किमतींमध्ये 2,943 रुपयांची घट झाली आहे. त्याचबरोबर मुंबईतील चांदीचा हा दर प्रति किलो 72354 रुपयांवर आला आहे.

सोन्याच्या किंमतींबाबत तज्ज्ञांचे मत काय आहे?
एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटी) तपन पटेल यांचे म्हणणे आहे की अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत झाल्यामुळे सोन्याच्या किंमतींवर दबाव वाढला. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याच्या किंमती 1,989 डॉलर प्रति औंसपर्यंत खाली आल्या आहेत. तसेच रशियाने बनवलेल्या कोरोना विषाणूच्या लसीमुळे ग्लोबल सेंटीमेंट सुधारल्या आहेत. ज्यामुळे शेअर बाजारात जोर वाढला आहे. म्हणूनच गुंतवणूकदारांनी सोन्याची विक्री जोरात केली.

सोने स्वस्त होईल
कोटक सिक्युरिटीजने आपल्या एका नोटमध्ये असे म्हटले आहे की, “जर अमेरिकन डॉलर मजबूत झाला तर सोन्यातील घसरण वाढू शकते. अशा परिस्थितीत नवीन सौदे जरा थांबूनच करा.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा.

ब्रेकिंग बातम्यासाठी : www.hellomaharashtra.in

Leave a Comment