लॉकडाऊन कालावधीत ‘या’ २ टेलिकॉम कंपन्यांनी गमावले लाखो ग्राहक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । कोरोनामुळं लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनच मोठा फटका टेलिकॉम क्षेत्रातील बड्या कंपन्यांनाही बसला आहे. एप्रिल महिन्यात दूरसंचार कंपन्यांनी तब्बल ८२ लाख ग्राहक गमावल्याची माहिती समोर आली आहे. इंडिया रेटिंग्स अँड रिसर्चनं प्रसिद्ध केलेल्या अहवालात यासंदर्भातील माहिती देण्यात आली. यापूर्वी मार्च महिन्यात टेलिकॉम कंपन्यांनी २८ लाख ग्राहक गमावले होते.

इंडिया रेटिंग्स अँड रिसर्चच्या अहवालानुसार लॉकडाऊन कालावधीत सर्वाधिक फटका हा एअरटेल आणि व्होडाफोन-आयडिया या कंपन्यांना बसला. संपूर्ण उद्योगविश्वाच्या दृष्टीनं मार्च आणि एप्रिल महिन्यात अनुक्रमे २८ लाख आणि ८२ लाख ग्राहकांची मासिक घट पाहायला मिळाली. एअरटेल आणि व्होडाफोन-आयडिया या कंपन्यांच्या ग्राहकांमध्ये मोठी घट होणं हे या मोठ्या आकड्यांमागील कारण आहे. तर दुसरीकडे टेलीकॉम क्षेत्रातील मोठी स्पर्धक कंपनी रिलायन्स जिओच्या ग्राहकांमध्ये लॉकडाऊनच्या कालावधीत मोठी वाढ झाल्याचं दिसून आलं,’ असं अहवालात नमूद करण्यात आलं आहे.

मार्च अखेरिसपर्यंत लागू करण्यात आलेला लॉकडाउन एप्रिलच्या संपूर्ण महिन्यातही लागू होता. यामुळेच ग्राहकांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. यापुढील कालावधीतही दूरसंचार कंपन्यांवर प्रभाव दिसून येईल, असं संस्थेनं आपल्या अहवालात म्हटलं आहे. दरम्यान, लॉकडाउनमुळे सर्वच क्षेत्रांवर मोठा परिणाम झाला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment