लॉकडाऊन मुळे नोकरी गेली म्हणून लॉटरीचं तिकीट काढलं आणि बनला करोडपती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूने सध्या जगभर थैमान घातले आहे. कोरोनामुळे जाहीर करण्यात आलेल्या लोकडाऊनमुळे अनेकांची नोकरी गेली आहे. अनेक मोठमोठ्या कंपन्याही लॉकडाऊन काळात बंद असल्याने त्याचा अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम झाला आहे. मात्र अशात न्यूझीलंडमधील एका व्यक्तीला नोकरी गेल्याचा मोठा फायदा झाला आहे. हाताचे काम गेल्याने नैराश्यात गेलेल्या हॅमिल्टन शहरातील एकाने सहज लॉटरीचे तिकीट विकत घेतले आणि त्याला चक्क 10.3 million (New Zealand Dallers) ची लॉटरी लागली आहे. (भारतीय रुपयांमध्ये अंदाजे ४७.७ कोटी रुपये)

स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, लॉकडाउन काळात नोकरी गमावल्यानंतर सदर व्यक्ती घरातच होता. या व्यक्तीची पत्नी ही वैद्यकीय क्षेत्रात काम करत असल्यामुळे तिला कामासाठी बाहेर पडावं लागतं. “मी घरी आले तेव्हा माझा नवरा किचनमध्ये एका टेबलवर बसला होता. एका जागेवर पाकीट ठेवलं होतं, आणि त्याकडे पाहून तो थोडा विचीत्र वागत होता. त्याने मला ते पाकीट उघडायला सांगितलं. ज्यात वर्तमानपत्राच्या बातमीचं कात्रण होतं, ज्यामध्ये हॅमिल्टनमधील एका व्यक्तीने लॉटरी जिंकल्याची बातमी होती. हे तू मला का दाखवत आहेस असं विचारल्यानंतर नवऱ्याने आपणच ती लॉटरी जिंकल्याचं मला सांगितलं.”

“सुरुवातीला मला यावर विश्वास बसला नाही आणि नवरा माझी मस्करी करतोय असं वाटलं. पण त्याने मला लॉटरीवाल्यांकडून आलेला इ-मेल दाखवला. यानंतर खात्री करण्यासाठी मी माझ्या लॉटरी तिकीटावरुन वेबसाईटवर लॉगइन केलं आणि पाहिल्यावर ती लॉटरी आम्हीच जिंकलेलो आहोत याची मला खात्री पटली.” पत्नीने स्थानिक प्रसारमाध्यमांना माहिती दिली. इतक्या मोठ्या रकमेचं इनाम जिंकल्यानंतरही या परिवाराने आपल्याला सामान्य लोकांसारखं आयुष्य जगायला आवडेल असं सांगितलं. घरातले काही खर्च, गाडीची डागडुजी आणि मुलांच्या शिक्षणासाठीची सोय केल्यानंतर उर्वरित रकमेतून इतरांना मदत करणार असल्याचं या परिवाराने सांगितलं.

Leave a Comment