Vodafone-Idea ला मिळाली नवीन ओळख, आता म्हंटले जाणार Vi

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । टेलिकॉम कंपनी व्होडाफोन आयडियाने आज आपल्या रिब्रॅंडिंगची घोषणा केली आहे. ही कंपनी आता vi म्हणून ओळखली जाईल. कंपनीची मालकी व्होडाफोन आणि यूकेच्या आदित्य बिर्ला समूहाकडे आहे. 2018 मध्येच या दोन्ही कंपन्या विलीन झाल्या आणि व्होडाफोन आयडिया नावाची कंपनी अस्तित्वात आली. v व्होडाफोन तर i हे आयडियासाठी आहे. आज नवीन ब्रँडिंगची घोषणा करताना कंपनीने म्हटले आहे की, या दोन ब्रँडचे विलीनीकरण हे आतापर्यंतचे जगातील सर्वात मोठे टेलिकॉम इंट्रीग्रेशन आहे. यासह आता कंपनीनेही शुल्कवाढीचेही संकेत दिलेले आहेत.

नवीन ब्रँड लॉन्च करताना कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींदर कोलिजन म्हणाले की, दोन वर्षांपूर्वी व्होडाफोन आयडियाचे विलीनीकरण करण्यात आले होते. तेव्हापासून आम्ही हे दोन्ही मोठे नेटवर्क, आमचे लोक आणि प्रोसेस यांच्या इंट्रीग्रेशनसाठी काम करीत होतो. आज मी Vi या ब्रँडची ओळख करुन देऊन खूप आनंदी आहे. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणाले की, ही एक महत्त्वाची पायरी आहे. त्याचबरोबर एकीकरणाची प्रक्रिया पूर्ण केली गेली आहे.

दर वाढीचे संकेत
रवींदर यांच्या म्हणण्यानुसार कंपनी आपले पहिले पाऊल म्हणून शुल्क वाढवण्यास तयार आहे. हे नवीन दर कंपनीला एआरपीयू सुधारण्यास मदत करेल. हे सध्या 114 रुपये आहे, तर एअरटेल आणि जिओचे एपीआरयू अनुक्रमे 157 आणि 140 रुपये आहेत.

कंपनीच्या बोर्डाने 25,000 कोटी रुपये वाढविण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली
कंपनीच्या मंडळाने नुकतीच इक्विटी शेअर्स किंवा ग्लोबल डिपॉझिटरी रिसीट, अमेरिकन डिपॉझिटरी रिसीट, विदेशी चलन बाँड, कन्व्हर्टेबल डिबेंचर्सद्वारे 25,000 कोटी रुपये जमा करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली. यामुळे रोखीच्या संकटात अडकलेल्या कंपनीला मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. या दोन्ही कंपनीच्या ग्राहकांची संख्या सातत्याने कमी होत आहे. तसेच, युझर्सने त्याच्या सरासरी उत्पन्नातही घट केली आहे. कंपनीला थकित एजीआरच्या रूपात सरकारला 50,000 कोटी रुपये देणे आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”

Leave a Comment