या आठवड्यात सोन्या-चांदीची किंमत काय होती त्यासंदर्भातील संपूर्ण अपडेट्स येथे जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । या आठवड्यात दिल्ली बुलियन मार्केटमध्ये सोन्याच्या किंमतीत प्रति 10 ग्रॅम 207 रुपयांची वाढ झाली आहे. त्याचबरोबर चांदीच्या दरातही या आठवड्यात प्रति किलो 251 रुपयांची वाढ झाली आहे. मात्र, या मौल्यवान धातूंच्या किंमती या आठवड्यात दररोज चढ-उतार करताना दिसल्या.

आठवड्याच्या पहिल्या व्यापारी सत्रानंतर दिल्ली बुलियन मार्केटमध्ये सोन्याच्या किमतींमध्ये प्रति 10 ग्रॅम 24 रुपयांची किंचित वाढ झाली आहे. त्यानंतर प्रति 10 ग्रॅमची किंमत 52,465 रुपयांवर पोहोचली आहे. सोमवारी चांदी 222 रुपयांनी वाढली. सोमवारी चांदी 69,590 रुपयांवर बंद झाली.

सोमवार नंतर मंगळवारीही प्रति 10 ग्रॅम सोन्याच्या किंमतीत 422 रुपयांची वाढ झाली. यानंतर मंगळवारी प्रति 10 ग्रॅम सोन्याची किंमत 53,019 रुपयांवर पोहोचली. मंगळवारी डॉलरच्या तुलनेत रुपयाची वाढ आणि सकारात्मक जागतिक वृत्तीमुळे सोन्याच्या किंमतीत वाढ झाली. या दिवशी चांदीची किंमत 1,013 रुपयांनी वाढली, त्यानंतर चांदीचा दर हा 70,743 रुपये झाला.

गुरुवारी सोन्याच्या किंमतीत प्रति 10 ग्रॅम 608 रुपयांची घट झाली आहे. यानंतर सोन्याची किंमत 52,463 रुपयांवर आली. चांदीच्या दरातही 1,214 रुपयांची घसरण झाली. यानंतर चांदीचा भाव 69,242 रुपयांवर आला होता.

शुक्रवारी आठवड्याच्या अखेरच्या व्यापारी सत्रात सोन्याच्या प्रति 10 ग्रॅम किंमती या एकूण 224 रुपयांनी वाढल्या. शुक्रवारच्या व्यापारानंतर प्रति 10 ग्रॅम सोने 52,672 रुपयांवर पोचले. त्याचबरोबर चांदीच्या दरातही प्रति किलो 620 रुपयांची वाढ झाली, त्यानंतर याची किंमत ही 69,841 रुपयांवर पोहोचली आहे.

आंतरराष्ट्रीय किंमतीतील वाढ आणि अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या मजबुतीचा परिणाम या दोन्ही मौल्यवान धातूंच्या किंमतींवर झाला आहे. चीननंतर भारत दुसर्‍या क्रमांकाचे सोन्याचा खरेदीदार आहे. भारतातील सोन्यावर 12.5 टक्के आयात शुल्क आणि तीन टक्के जीएसटी आकर्षित होतो. यावर्षी भारतातील सोन्याच्या किंमतीत 30 टक्क्यांनी वाढ झाली आहे. ऑगस्टमध्ये सोन्याची आयात वाढून 7.7 अब्ज डॉलरवर गेली आहे, जी गेल्या वर्षी याच महिन्यात 1.36 अब्ज डॉलर होती.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment