संचारबंदीच्या काळात काय सुरु राहणार आणि काय बंद राहणार? घ्या जाणून

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टीम, हॅलो महाराष्ट्र । कोरोना व्हायरसचे वाढते संकट ध्यानात घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यात संचारबंदी लागू केली आहे. यामुळे आता जीवनावश्यक गोष्टी वगळता सर्व व्यवहार बंद राहणार आहेत. त्याचसोबत जिल्ह्याच्या सीमा सुद्धा बंद करण्यात आल्या आहेत. राज्यावर बिकट परिस्थिती आणायची नसेल तर सरकारचे निर्देश काटेकोरपणे ऐका असं आवाहन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. पुढचे काही दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत. ती भीती लक्षात घेऊच आपण संचारबंदी लागू करत आहोत असंही उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलं आहे. संचारबंदीच्या काळात कोणत्या गोष्टी सुरु राहणार आणि कोणत्या गोष्टी बंद राहणार हे जाणून घेऊयात.

या गोष्टी सुरु राहतील –
अन्न धान्य, औषधे, औषध व अन्न धान्यांची वाहतुक करणारी वाहने, औषधाचे कारखाने, बॅकरी, पशुखाद्याची दुकाने, पाळीव प्राण्याचे दवाखाने, बी – बीयानांची दुकाने

या गोष्टी बंद राहतील –
सर्व मंदिरे आणि प्रार्थमा स्थळे बंद राहतील. बस, रेल्वे बंद राहतील. खाजगी वाहनेही अनावश्यक नसेल तर बाहेर पडणार नाहीत. यातही रिक्षात एकावेळी चालक आणि सोबत एक व्यक्ती प्रवास करु शकतील. खाजगी वाहनातूनही एकावेळी चालक आणि दोन असे प्रवास करु शकतील.

ब्रेकिंग बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 8080944419 या नंबरवर ”Hello News” टाईप करून त्वरित Whatsapp करा.

हे पण वाचा –

Big Breaking! तुरुंगातील कैद्यांना सोडून द्या, सर्वोच्च न्यायालयाचा आदेश!

स्वत:ला वाचवा, स्वत:च्या कुटुंबाला वाचवा! – पंतप्रधान मोदी

मुंबईसाठी धोक्याची घंटा! १२ तासात सापडले कोरोनाचे १० नवीन रुग्ण

राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ८९ वर, काल संध्याकाळ पासून १५ रुग्न वाढले

पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेण्याची हीच खरी वेळ आहे – अविनाश धर्माधिकारी

अबब! कोरोनाच्या चाचणीसाठी मोजावे लागणार तब्बल ४५०० रुपये, शासनाचे निर्देश

धक्कादायक..!! औरंगाबादमध्ये जनता कर्फ्युदिनीच पोलीस अधिकाऱ्याच्या मुलीचं शाही लग्न

Big Breaking | महाराष्ट्रात आज पासून संचारबंदी, सर्व जिल्ह्यांच्या सीमा बंद - मुख्यमंत्री ठाकरे

Leave a Comment