..म्हणून विप्रोच्या ‘सीईओं’नी दिला आपल्या पदाचा राजीनामा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । आयटी क्षेत्रातील मोठी कंपनी असलेल्या विप्रोचे व्यवस्थापकीय संचालक (सीईओं) आबिदअली नीमचवाला यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. एप्रिल २०१५ मध्ये नीमचवला यांनी विप्रोमध्ये समूह अध्यक्ष आणि सीओओ म्हणून पदभार स्वीकारला होता. गेली चार वर्ष आबिदअली यांनी कंपनीची धुरा यशस्वीपणे सांभाळली. दरम्यान कौटुंबिक कारणास्तव आबिदअली यांनी राजीनामा दिला असल्याचे कंपनीने शेअर बाजाराला कळवलं आहे. विप्रोच्या संचालक मंडळाने नव्या ‘सीईओ’ची निवड प्रक्रिया सुरु केली आहे. ही नियुक्ती होईपर्यंत नीमचवाला यांच्याकडे तात्पुरता पदभार राहील, असे कंपनीने शेअर बाजाराला कळवलं आहे.आबिदअली नीमचवाला यांनी राजीनामा दिल्याचे पडसाद विप्रोच्या शेअरवर उमटले.

२०१५ साली विप्रोचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती झाल्यानंतर आबिदअली यांनी विप्रोत मोठे योगदान दिले. नवी अधिग्रहणे आणि डिजिटल व्यवसाय वाढविण्यात त्यांचा मोलाचा वाटा राहिला. कंपनीचा पाया भक्कम करण्यात नीमचवाला यांचे नेतृत्व निर्णायक ठरले अशा शब्दात विप्रोचे अध्यक्ष रिशद प्रेमजी यांनी नीमचवाला यांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

आबिदअली नीमचवाला यांनी सांभाळलेल्या जबाबदाऱ्या
एप्रिल २०१५ मध्ये नीमचवला यांनी विप्रोमध्ये समूह अध्यक्ष आणि सीओओ म्हणून पदभार स्वीकारला होता. त्याआधी ते ‘टीसीएस’मध्ये २३ वर्षे होते. फेब्रुवारी २०१६ मध्ये त्यांना बढती मिळाली आणि ते विप्रोचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी बनले. ३१ जानेवारी २०२१ रोजी त्यांचा कार्यकाळ पूर्ण होणार होता. मात्र त्याआधीच त्यांनी कौटुंबिक कारणास्तव पदाचा राजीनामा दिला.

ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

हे पण वाचा-

उर्मिला मातोंडकरला सोशल मीडियावर केलं जात आहे ट्रोल; काय आहे कारण..

1965 मध्ये बजाज ग्रुपची धुरा हातात घेतलेले राहुल बजाज आता कंपनीला करणार ‘रामराम’

कुणाल कामरा काही अर्णबचा पिच्छा सोडेना!प्रवासबंदीनंतर कामराने केली अर्नबच्या ऑफीसबाहेर पोस्टरबाजी

Leave a Comment