हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| विशाखापट्टणममध्ये मासेमारी बंदरात भीषण आग लागल्याची दुर्घटना घडली आहे. एका बोटीला लागलेली आग पसरत गेल्यामुळे 40 बोटी जळून खाक झाल्या आहेत. या दुर्घटनेमुळे मच्छीमारांचे आणि बोट मालकांचे मोठे नुकसान झाले आहे. परंतु अद्यापही आग कशी लागली याबाबतची माहिती समोर आलेली नाही. सध्या या सर्व घटनेचा तपास पोलीस करीत आहेत.
समोर आलेल्या माहितीनुसार, रविवारी मध्यरात्री अनेक बोटी विशाखापट्टणमच्या बंदरावरील किनाऱ्यावर आल्या होत्या. याचंवेळी एका बोटीत स्फोट झाल्याचा आवाज मच्छीमारांना आला. अचानक झालेल्या या स्फोटामुळे त्यांच्या मनात भीती निर्माण झाली. यानंतर ज्यावेळी ते किनाऱ्यावर आले तेव्हा त्यांनी पाहिले की, किनाऱ्यावरील सर्वच बोटींना आग लागली आहे. तब्बल 40 बोटीच्या आगीच्या विळख्यात सापडला होत्या. ज्यामुळे 30 कोटींपेक्षा जास्त नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
#WATCH आंध्र प्रदेश: विशाखापट्टनम में मछली पकड़ने के बंदरगाह पर भीषण आग लग गई। आग 40 नावों तक फैल चुकी है। दमकल की कई गाड़ियां मौके पर मौजूद हैं। पुलिस केस दर्ज कर मामले की जांच कर रही है। pic.twitter.com/qj2PWM0mbb
— ANI_HindiNews (@AHindinews) November 20, 2023
या आगीची दाहकता बघता स्थानिकांनी लगेच अग्निशामक दलाला सूचना दिल्या होत्या. त्यानंतर अग्निशामक दलाच्या जवानांनी येऊन ही आग विझवली. मुख्य म्हणजे, या दुर्घटनेत मच्छिमारांनी संशय व्यक्त केला आहे की, ही आग काही अज्ञात व्यक्तींनी लावली असावी. त्यामुळे या सर्व घटनेचा पोलिसांकडून तपास सुरू आहे. तसेच त्यांनी, घडलेल्या घटनेप्रकरणी गुन्हा नोंदवून घेतला आहे. या आगीत तब्बल 40 बोटी जळून खाक झाल्या आहेत. तसेच, 30 कोटींपेक्षा जास्त नुकसान झाल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
दरम्यान, बंदरावर लागलेल्या आगेबाबत माहिती देत विशाखापट्टणमचे पोलिस उपायुक्त आनंद रेड्डी यांनी म्हटले आहे की “विशाखापट्टणम मासेमारी बंदरात एका बोटीला आग लागली आणि नंतर मध्यरात्री सुमारे 35 फायबर-यंत्रित नौकांमध्ये पसरली. आता ही आग विझवण्यात अग्निशामक दलाला यश आले आहे. परंतु, आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. परंतु मच्छीमारांचे आर्थिक नुकसान झाले आहे.”