Wednesday, October 5, 2022

Buy now

सोनिया गांधी, राहुल गांधींच्या ED च्या समन्सवर काँग्रेसने दिली ‘ही’ पहिली प्रतिक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ईडीच्यावतीने काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि खासदार राहुल गांधी यांना नुकतेच समन्स बजावण्यात आलेले आहे. 2015 मध्ये तपास यंत्रणेने बंद केलेल्या नॅशनल हेराल्ड प्रकरणावर बजावल्यामुळे राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. बजावल्यामुळे त्यावर आता काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया देण्यात आलेली आहे. काँग्रेस नेते अभिषेक मनु सिंघवी व रणदीप सुरजेवाला यांनी थेट केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. “कितीही कारवाई केली तरी आम्ही काय झुकणार नाही. यातही आम्ही छाती ठोकपणे लढू आणि नक्की जिंकू” असे सिंघवी यांनी म्हंटले आहे.

सोनिया गांधी व राहुल गांधी यांना ईडीने समन्स बजावल्यानंतर काँग्रेसचे नेते सिंघवी व रणदीप सुरजेवाला यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी रणदीप सुरजेवाला म्हणाले की, ईडीच्या नोटिसीमागील खऱ्या षडयंत्राचा राजा हे नरेंद्र मोदी हे आहेत. आणि त्यांचे शस्त्र हे त्यांचे आवडते पालतू ईडी हे आहे. देशाची सध्या चालू असलेल्या मुद्यांपासून दिशाभूल करण्यासाठी मोदींकडून अशा प्रकारच्या नोटिसा पाठवल्या जात आहे.

राजकारणात बदल्याच्या भावनेत आंधळी झालेली मोदी सरकार आता पुन्हा अनेक षडयंत्र रचले आहे. त्यातूनच पक्षाध्यक्षा सोनिया गांधी व रोहित गांधी यांना ईडीच्या मार्फत समन्स बजावली आहे. मात्र, आम्ही घाबरणारे नाही. आम्ही लढू आणि जिंकूही, असे सुरजेवाला यांनी म्हंटले आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी व खासदार राहुल गांधी यांना ईडीच्यावतीने ज्या प्रकरणात समन्स बजावण्यात आलेले आहे ते नेमकं प्रकरण काय आहे? असा प्रश्न अनेकांना पडतो. तर ते प्रकरण आहे, नॅशनल हेराल्ड प्रकरणात 55 कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप सुब्रमण्यम स्वामी यांनी केला होता. 2012 मध्ये स्वामी यांनी एक याचिका दाखल करून काँग्रेस नेत्यांवर फसवणुकीचे आरोप केले होते. 2008 मध्ये एजेएलची सर्व प्रकाशने बंद करण्यात आली होती. तसेच या एजेएल कंपनीवर 90 कोटींचे कर्जही झाले होते. त्यानंतर काँग्रेसने यंग इंडियन प्रायव्हेट लिमिटेड नावाने एक नवी अव्यवसायिक कंपनी बनवली. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यासहीत मोतीलाल व्होरा, सुमन दुबे, ऑस्कर फर्नांडिस आणि सॅम पित्रौदा आदी नेते या कंपनीत संचालक होते. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याकडे या कंपनीचे 76 टक्के शेअर होते. तर इतरांकडे 24 टक्के शेअर होते. काँग्रेस पक्षाने या कंपनीला 90 कोटींच कर्जही दिले होते.