Flipkart वर आजपासून Moto G73 5G ची विक्री सुरू, पहा फीचर्स अन् किंमत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतात नुकतेच 5G सर्व्हीस सुरु झाली आहे, हळूहळू ज्याचा विस्तार देशातील शहरांमध्ये होतो आहे. याचा जास्तीत जास्त लाभ घेण्यासाठी बाजारात अनेक 5G सपोर्टेड स्मार्टफोन लाँच केले जात आहेत. आताही Motorola कंपनीकडून आपल्या नवीन G-सीरीजमधील Moto G73 5G हा स्मार्टफोन आजपासून भारतीय बाजारामध्ये खरेदीसाठीही उपलब्ध करून दिला आहे. हे लक्षात घ्या कि, गेल्या आठवड्यात हा स्मार्टफोन भारतात लॉन्च करण्यात आला आहे. चला तर मग या स्मार्टफोनच्या फीचर्स बाबतची माहिती जाणून घेउयात…

Moto G73 5G India launch date, specifications, colour options leaked

या नवीन Moto G73 5G मध्ये 120Hz रिफ्रेश रेट, फुल HD+ (2400 × 1080 पिक्सेल) रिझोल्यूशन आणि सेंटर्ड पंच-होल नॉचसहीत 6.5-इंचाचा LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. हे Android च्या लेटेस्ट व्हर्जन Android 13 सहीत प्री-लोडेड आहे.

Motorola Moto G73 5G - Price in India, Specifications & Features | Mobile  Phones

या नवीन G-सिरीज स्मार्टफोनमध्ये ऑक्टा-कोर मीडियाटेक डायमेन्सिटी 930 प्रोसेसर आहे जो त्याच्यासोबत IMG BXM-8-256 ग्राफिक्स आणतो. तसेच या स्मार्टफोनमध्ये 8GB LPDDR4X रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज उपलब्ध आहे. यासोबतच (हायब्रिड) मायक्रो-एसडी कार्ड स्लॉटसहीत आणखी स्टोरेज वाढवता देखील येईल.

Moto G73 5G हुआ लॉन्च, प्राइस और स्पेसिफिकेशन्स के दमपर मिडबजट सेग्मेंट में  मचाएगा तहलका!

Moto G73 5G च्या कॅमेर्‍याबाबत बोलायचे झाल्यास यामध्ये 50MP रिअर कॅमेरा आणि 16MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच यामध्ये पॉवरसाठी 5000mAh बॅटरी युनिट देखील दिले गेले आहे. हे टाइप-सी पोर्टवर 30W टर्बोपॉवर फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. या स्मार्टफोनमध्ये सुरक्षेसाठी साइड-माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर दिला गेला आहे. यामध्ये स्टिरिओ स्पीकर सेटअप तसेच 3.5 मिमी ऑडिओ जॅक पॅक मिळेल. ज्याला IP52 रेटिंग देखील देण्यात आले आहे ज्यामुळे ते स्प्लॅश-प्रतिरोधक बनते.

Motorola strengthens its 5G portfolio with Moto G73 launch - The Hindu

कनेक्टिव्हिटीसाठी यामध्ये ड्युअल-सिम, 5G, WiFi 802.11 a/b/g/n/ac, Bluetooth 5.3, NFC, GPS, GLONASS आणि Galileo उपलब्ध आहे. या नवीन Moto G73 5G स्मार्टफोनमध्ये मिडनाईट ब्लू आणि ल्युसेंट व्हाइट असे पर्याय मिळतील. हे लक्षात घ्या कि, या स्मार्टफोनच्या 8GB + 128GB या व्हेरिएंटची भारतात 18,999 रुपये किंमत ठेवण्यात आलेली आहे. लॉन्च ऑफर म्हणून, Motorola हँडसेटच्या खरेदीवर 2000 रुपयांचा एक्सचेंज बोनस दिला जातो आहे. तसेच नेहमीप्रमाणे, Flipkart Axis Bank च्या क्रेडिट कार्ड ग्राहकांना 5% कॅशबॅक देखील मिळेल.

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.flipkart.com/motorola-g73-5g-midnight-blue-128-gb/p/itm0e1cfbbce3e09

हे पण वाचा :
Freedom 251 Scam : जगातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन घोटाळ्याविषयी जाणून घ्या
Kotak Mahindra Bank कडून ग्राहकांना मोठा धक्का, कर्जावरील व्याज दरात केली वाढ
EDLI Scheme म्हणजे काय ??? जाणून घ्या त्याच्याशी संबंधित ‘या’ खास गोष्टी
Aadhar Card अपडेट करण्यासाठी 14 जूनपर्यंत द्यावे लागणार नाहीत पैसे, अशा प्रकारे करा अपडेट
Komaki LY Pro : दोन बॅटरी असलेली ‘ही’ गाडी एका चार्जमध्ये देते 180 किमी पर्यंतची रेंज, किंमत जाणून घ्या