पाच दिवस, ४६०० किलोमीटर अंतर आणि दोन चालक, श्रीनिवास पाटील यांच्याकडून विशेष कौतुक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। सध्या संचारबंदीमुळे आंतरराज्यीय वाहतूक अद्याप सुरु करण्यात आलेली नाही. अशा परिस्थितीत पश्चिम बंगालमधील कामगारांना घरी पोहोचविण्यासाठी दोन चालकांनी चक्क पाच दिवस प्रवास केला. पाच दिवसाचा प्रवास करून ४६०० किलो मीटरचे अंतर कापत पश्चिम बंगालमधील मजुरांना या दोघांनी सुखरूप घरी पोहचवले. सुरेश तुकाराम जगताप आणि  संतोष सुरेश निंबाळकर असे या दोन एस.टी. चालकांचे नाव असून त्यांनी आज खासदार श्रीनिवास पाटील यांची भेट घेतली.

या दोघांनी पार पाडलेली जोखमीची कामगिरी व कर्तव्याप्रती दाखवलेली निष्ठा याबद्दल पाटील यांनी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला. पश्चिम बंगाल राज्यातल्या २२ मजुरांना त्यांच्या गावी पोहचवण्याची जबाबदारी सातारा आगाराने घेतली होती. सातारा आगाराने घेतलेली ही जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी श्री. सुरेश जगताप आणि श्री. संतोष निंबाळकर या दोन चालकांवर सोपविण्यात आली. त्यांनी सलग दोन दिवस आणि रात्रीचा प्रवास करत त्या मजुरांना पश्चिम बंगालमधील नुधीया या जिल्ह्यात सुखरूप पोहचवले.

साताऱ्याकडे माघारी येत असताना बससोबत ते दोघेही अम्फाम वादळात आठ तास खडकपूर येथे अडकले होते. त्यानंतर पुन्हा सलग दोन दिवस आणि रात्रीचा प्रवास करून ते सुरक्षितपणे साताऱ्याला पोहचले. या दरम्यान त्यांनी सलग पाच दिवस आणि रात्र प्रवास करून साडे चार हजार किलोमीटरचे अतंर कापले. वाटेत आलेल्या वादळासह इतर संकटाचा त्यांनी बहाद्दुरीने सामाना केला. त्यांची कामाप्रती असलेली निष्ठा आणि त्यांनी दाखवलेले धैर्य कौतुकास्पद आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment