मुंबई ‘वुहान’ होण्याच्या मार्गावर? ५ हजारपेक्षा जास्त लोक कोरोनाबाधितांच्या संपर्कात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। दिवेसंदिवस राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा वाढतच आहे. त्यातही सर्वात जास्त कोरोनाबाधित रुग्ण हे मुंबईत वाढले आहेत. दरम्यान, मुंबईच्या चिंतेत आणखी वाढ करणारी बाब समोर आली आहे. मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या वाढण्याची शक्यता राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी वर्तवली आहे. मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या १६२ झाली आहे. तर मुंबईतील तब्बल ५ हजारापेक्षा अधिक लोक कोरोनाबाधित रुग्णांच्या ‘हाय रिस्क कॉन्टॅक्ट’मध्ये असल्याची चिंताजनक माहिती टोपे यांनी दिली. मुंबई महानगरपालिकेच्या कोरोना वॉर रूमधील अधिकाऱ्यांसोबत बैठक पार पडल्यांनंतर त्यांनी माध्यमांना ही माहिती दिली आहे.

मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या कमी करण्यासाठी सरकार प्रयन्त करत असून. मुंबईतील करोनाबाधितांची संख्या १६२ झाली आहे. पाच हजारांहून अधिक जण असे आहेत जे अशा लोकांच्या संपर्कात आले असून हाय रिस्क कॉन्टॅक्ट’मध्ये आहेत. ही संख्या आता ५३४३ इतकी आहे. या सर्वांना विलगीकरणात ठेऊन चाचणी केली जाणार आहे. सध्या सर्वांवर लक्ष ठेवलं जात आहे. चार हजार लोक या सर्वांवर लक्ष ठेवून आहेत. दरम्यान मुंबईतील वाढता आकडा चिंतेची बाब आहे. पुढे हे आव्हान कसं पेलायचं यासंबंदी बैठकीत चर्चा झाली असल्याची माहिती आरोग्यमंत्री टोपे यांनी यावेळी दिली.

करोनाचे रुग्ण वाढले आहेत पण त्याचं संक्रमण वाढू नये यासाठी पूर्ण प्रयत्न केले जात आहेत. जे लोक हाय रिस्क कॉन्टॅक्टमध्ये आहेत त्यांच्यावर पूर्ण बारकाईने लक्ष ठेवलं जात आहे. चार हजार लोकांच्या माध्यमातून परिस्थिती नियंत्रणात राखण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचं यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’

हे पण वाचा –

राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ३२१ वर, मुंबईत १६ तर पुण्यात २ नवे रुग्ण

खुशखबर! विनाअनुदानित गॅस सिलेंडरच्या किंमती झाल्या आणखी कमी

कोरोनाने जगभरात ४० हजार जणांचा मृत्यू, ८ लाखांहून अधिक जण बाधित

निजामुद्दीन मरकजचे ‘महाराष्ट्र कनेक्शन’; आरोग्य यंत्रणेची झोप उडाली

‘या’ भारतीय महिलेने इटलीची केली पोल-खोल, केला खळबळजनक खुलासा

Leave a Comment