काले गावात तब्बल 35 वर्षांनंतर महापुराची स्थिती; बाजारपेठ झाले जलमय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसांपासून राज्यात जोरदार पाऊस होत असून अतिवृष्टी निर्माण झालेली आहे. पावसाचा मोठा फटका पश्‍चिम महाराष्ट्राला बसला असून अनेक जिल्ह्यामध्ये महापुराची स्थिती उद्भवली आहे. सातारा जिल्ह्यामध्येही गेल्या दोन दिवसापासून धुवाधार पाऊस होत असून कराड तालुक्यातील काले या गावात तब्बल पस्तीस ते चाळीस वर्षानंतर महापुराची स्थिती निर्माण झालेली आहे.

काले गावातील बाजारपेठ या अतिशय महत्त्वाच्या ठिकाणी दक्षिण मांड नदीतून पाणी थेट शिरलं असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांकडून असं सांगण्यात येत आहे की गेल्या पस्तीस ते चाळीस वर्षात अशा प्रकारचा पाऊस आणि अशा प्रकारच्या पाण्याचा प्रवाह हा बघण्यात आलेला नव्हता.

काल्यातील शंभो महादेवाचे नदीकाठी असलेले मंदिर कालच पाण्याखाली गेले होते. पाण्याचा तोच प्रवाह गावात शिरला आणि संपूर्ण बाजारपेठ ही जलमय झाली. गावात अचानक वाढलेल पाणी पाहण्यासाठी कालेकरांनी एकच गर्दी केली असून पावसाचा जोर असाच चालू राहिला तर परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे.

सातार्‍यात माळीन सारखी दुर्घटना! 27 नागरीक ढीगार्‍याखाली? मध्यारात्री नक्की काय घडलं? Ground Report

दरम्यान, काले गावातील दोन्ही पूल पाण्याखाली गेले असून शेतात राहणाऱ्या लोकांची वाहतूक विस्कळीत झालेली आहे. गेल्या दोन दिवसापासून कराड आणि आसपासच्या गावांना पावसाचा जोरदार तडाखा बसलेला असून शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले आहे

Leave a Comment