म्युच्युअल फंडाद्वारे जास्त रिटर्न हवा असेल तर फॉलो करा ‘या’ टिप्स

नवी दिल्ली । म्युच्युअल फंडस् चांगले रिटर्न देतात, मात्र बाजाराच्या अधीन असल्यामुळे त्यामध्ये पूर्ण जोखीमही असते. तुम्ही तुमचा गुंतवणुकीचा पोर्टफोलिओ वैविध्यपूर्ण ठेवल्यास तुम्हांला कमी तोट्यात जास्त नफा मिळू शकेल. मात्र त्यासाठी म्युच्युअल फंड पोर्टफोलिओमध्ये तुमची गुंतवणूक एकाच ठिकाणी न ठेवता अनेक वेगवेगळ्या फंडांमध्ये ठेवावी. यासाठी आपला पोर्टफोलिओ वैविध्यपूर्ण असावा. वेगवेगळ्या मालमत्तेमध्ये गुंतवणुकीच्या विभागणीला एसेट एलोकेशन असे म्हणतात.

योग्य पोर्टफोलिओचा नियम असा आहे की, गुंतवणूक करण्यापूर्वी एखाद्याने गुंतवणुकीचा उद्देश आणि कालावधी ठरवला पाहिजे. गुंतवणुकीची मर्यादा जितकी जास्त असेल तितके इक्विटी फंडातील वाटप जास्त असेल आणि चांगला रिटर्न मिळेल.

जोखमीच्या क्षमतेनुसार म्युच्युअल फंड SIP गुंतवणूक
बाजारातील सर्व चढ-उतारानंतर म्युच्युअल फंडातून 15 टक्क्यांपर्यंत रिटर्न मिळतो आणि हा रिटर्न तुमच्या पोर्टफोलिओच्या विविधतेवरही अवलंबून असतो. तुमची जोखीम घ्यायची तयारी तुमचे एसेट एलोकेशन ठरवते. जर तुम्ही जास्त जोखीम घेऊ शकत असाल तर इक्विटी ऍलोकेशन जास्त असू शकते. येथे हे लक्षात ठेवा की, जोखीम जितकी जास्त असेल तितका रिटर्न जास्त असेल.

तुमच्या जोखीमेची तयारी कमी असेल तर तुम्हांला इक्विटीमधील गुंतवणूक कमी करावी लागेल. येथे तुम्ही जास्त रिटर्नची अपेक्षा करू शकत नाही. मग डेट फंडात गुंतवणूक करणे तुमच्यासाठी चांगले राहील.

गुंतवणूक करण्यापूर्वी अभ्यास करा
म्युच्युअल फंडात कोणी काय सांगितले किंवा कुठून काहीतरी ऐकले याच्या आधारे गुंतवणूक करू नका. गुंतवणूक करण्यापूर्वी फंड हाऊसेसच्या रिटर्न हिस्ट्रीचा अभ्यास केल्याची खात्री करा. रिटर्न हिस्ट्रीमध्ये केवळ एक-दोन वर्षांची हिस्ट्रीच नाही तर सुमारे दहा वर्षांचा रेकॉर्ड पाहिला पाहिजे. तुम्हाला फंड हाऊसेसच्या मॅनेजर्सबद्दल देखील माहिती असणे आवश्यक आहे.

म्युच्युअल फंड पोर्टफोलिओ तयार करणे
इक्विटी आणि डेट फंडांचा वेगळा पोर्टफोलिओ तयार करा. डेट पोर्टफोलिओमध्ये व्याजदर जोखीम आणि क्रेडिट जोखीम यांची काळजी घ्यावी लागेल. व्याजदरातील बदल हे डेट पोर्टफोलिओच्या रिटर्नवर परिणाम करू शकतात. जर तुम्ही डेट फंडात गुंतवणूक करत असाल तर शॉर्ट टर्मसाठी गुंतवणूक करा. व्याजदरातील बदल लॉन्ग टर्म गुंतवणुकीवर परिणाम करतात.