Twitter वर गायब होत आहेत फॉलोअर्स, संतप्त युजर्सनी नवीन भारतीय सीईओ पराग अग्रवाल यांना फटकारले

नवी दिल्ली । भारतात ट्विटरवरील लोकांचे फॉलोअर्स कमी होत आहेत. यामध्ये सामान्य युझर्ससोबतच अनेक मोठ्या सेलिब्रिटी आणि नेत्यांचाही समावेश आहे. युजर्सकडून ट्विटच्या माध्यमातून तक्रार करूनही कंपनीने याबाबत कोणतीही नवीन पॉलिसी जाहीर केली नाही किंवा फॉलोअर्स कमी होण्याचे कारणही दिले गेले नाही. लोकं सतत त्यांचे फॉलोअर्स कमी होण्याबद्दल ट्विट करत आहेत.

काही युझर्सनी काही मिनिटांत 100 पेक्षा जास्त फॉलोअर्स गमावले आहेत. काहींचे म्हणणे आहे की, अचानक हजारो फॉलोअर्स कमी झाले आहेत. मात्र, अद्याप यावर ट्विटरकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र या प्लॅटफॉर्मचे क्लीनअप केले जात आहे. यामध्ये, बॉट्स आणि इनेक्टिव अकाउंट्सला सस्पेंड केले जात आहेत.

इंटरनेट मीडियावर सुरु आहे कॅम्पेन
याबाबत ट्विटर युजर्स सतत कॅम्पेन राबवत असतात. यासाठी #ParagStopThis आणि #FollowersParhamala कॅम्पेन राबविण्यात येत आहे. फॉलोअर्सवर हल्ले का होत आहेत, असा सवाल युजर्स ट्विटरवर विचारत आहेत. मात्र, आता हळूहळू फॉलोअर्सची संख्या वाढू लागल्याची माहिती मिळत आहे. वाढणे आणि कमी होण्याचे हे चक्र सुरूच आहे. अनेक युझर्सनी ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल यांच्यावरही टीका केली असून, फॉलोअर्स कमी होण्यासाठी ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल यांना जबाबदार धरले आहे.

ट्विटरने हे बदल केले आहेत
ट्विटरने आपल्या वैयक्तिक माहिती सिक्योरिटी पॉलिसी मध्ये 1 डिसेंबरपासून बदल केले आहेत. ट्विटरने युझर्सना फोटो आणि व्हिडिओ सारख्या मीडिया फाइल्स खाजगीत शेअर करण्यावर बंदी घातली होती. आता परवानगीशिवाय कोणीही युझरला मीडिया फाइल्स पाठवू शकत नाही. याशिवाय ट्विटरने घराचा पत्ता, ओळख दर्शविणारे डॉक्यूमेंट्स आणि कॉन्टेक्ट इंफार्मेशन यासारखी संवेदनशील माहिती असलेल्या मीडिया फाइल्सवर बंदी घातली आहे.

You might also like