फूड डिलिव्हरी अ‍ॅप Zomato, Swiggy तांत्रिक अडचणींमुळे डाउन; ग्राहक झाले नाराज

नवी दिल्ली । Zomato आणि Swiggy हे फूड ऑर्डरिंग अ‍ॅप्स बुधवारी दुपारी बंद झाले. दुपारच्या जेवणाच्या वेळी ऑर्डरची संख्या वाढते त्याच वेळी ग्राहकांना दोन्ही अ‍ॅपमध्ये अनेक समस्यांना सामोरे जावे लागले आहे. सोशल मीडियावर अनेक यूझर्स अशा तक्रारी करत आहेत. एका यूझरने लिहिले आहे की,” त्यांना ऑर्डर करता येत नाही. तसेच, ऑर्डर ट्रॅक करता येत नसल्याच्या तक्रारी देखील अनेक लोकं यावेळी करत आहेत.

ग्राहकांच्या तक्रारीला प्रतिसाद देताना, Zomato Care ने सर्व्हिस प्रॉब्लेम असल्याचे मान्य केले आणि गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त केली.

zomato

दुसर्‍या यूझरने सांगितले, “Swiggy वरील आपल्या आवडत्या रेस्टॉरंटमधून ऑर्डर करण्याचा पर्याय काम करत नाही. यावेळी Swiggy ने यूझरला उत्तर दिले की, “तांत्रिक त्रुटींमुळे आम्हाला होत असलेल्या त्रासाबद्दल आम्ही दिलगीर आहोत. काही समस्या आहेत ज्या सोडवण्यासाठी आम्ही काम करत आहोत.”

swiggy

Swiggy ने आपल्या एका ग्राहकाच्या तक्रारीला उत्तर देताना लिहिले की,”आम्ही ते लवकरच दुरुस्त करण्याचा प्रयत्न करत आहोत.”