वनविभागाची कारवाई : राष्ट्रीय महामार्गावर खैर लाकडासह ट्रक जप्त

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड | खैर या बहुमुल्य प्रजातीची विनापरवाना वृक्षतोड करुन त्यापासून माल तयार करुन वाहतुक करीत असताना वनविभागाने खैर लाकूड माल व ट्रक जप्त केला. या कारवाईत 4 लाख 67 हजार 52 रुपये किंमतीचा मुद्देमाल वनविभागाने जप्त केला आहे.

वनविभागाने दिलेली माहिती अशी, गुरूवारी दि. 10 मार्च रोजी सहाययक वनसंरक्षक (वनीकरक व कॅम्पा) सातारा हे मौजे पुणे-बेगलोर NH-०४ रोडवरती रोडगस्त करीत असताना संशयित वाहन ट्रक नंबर (MH-40/7307) चा तपास केला. यावेळी खैर या प्रजातीचा सोलीव माल विनापरवाना वाहतुक करताना आढळून आले. वनविभागाने ट्रक व लाकूड माल असा 4 लाख 67 हजार 52 रुपये किंमतीचा मुद्देमाल वनविभागाने जप्त केला आहे.

तरी सदर प्रकरणी वाहन चालक भोलानाथ धरमराज यादव (वय- 44 वर्षे रा. आझादनगर डोंगरकलिया शिवमंदिर डुंगरा वाकी, तालुका पारडी, जि. वल्साद गुजरात) यांना ताब्यात घेतले आहे. सदर गुन्ह्यातील पुढील तपास सातारचे उपवनसंरक्षक महादेव मोहिते, व सहाययक वनसंरक्षक महेश झांजुर्णे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास कराडचे वनक्षेत्रपाल तुषार नवले व वनपाल रमेश कुंभार हे करीत आहेत. वनकर्मचारी ए. एन. जाधव, वनरक्षक चोरे, डी. एच. अवघडे, शि. ज. पाटील, वनरक्षक म्होप्रे व शंभुराज माने, श्रीकांत चव्हाण यांनी कारवाई केली.

Leave a Comment