रायपूर । छत्तीसगढचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांना त्याच्या राहत्या घरी हृदय विकाराचा तीव्र झटका आला. यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या त्यांना व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आलं आहे. मात्र, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. अजित जोगी यांचे पुत्र असलेलया अमित जागी यांनी प्रसार माध्यमांना दिलेल्या माहितीप्रमाणे, अजित जोगी आज शनिवारी दुपारी आपल्या राहत्या घरी नाश्ता करत असताना अचानक त्यांची तब्बेत बिघडली आणि त्यांना तात्काळ रुग्णालयात भरती करण्यात आलं. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे अमित जोगी यांनी सांगितलं.
Former Chhattisgarh CM Ajit Jogi has suffered a cardiac arrest at home and has been put on ventilator at the hospital. His condition is critical: Shree Narayana Hospital, Raipur (File pic) pic.twitter.com/yWvDUhhnOc
— ANI (@ANI) May 9, 2020
दरम्यान, छत्तीसगढचे विद्यमान मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी अजित यांचे पुत्र अमित जोगी यांना फोने करून अजित जोगी यांच्या प्रकृतीची चौकशी केली. यावेळी अमित यांनी वडिलांची तब्बेत सध्या ठीक असून चिंता करण्याची गोष्ट नसल्याचे सांगितले. अमित जोगी यांच्याशी बोलताना मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी राज्य सरकार प्रत्येक संभव मदत करेल असे आश्वासन दिलं. अजित जोगी काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांपैकी एक मानले जातात. मात्र, २०१६ मध्ये काँग्रेसमधील मदभेदामुळं त्यांनी जनता कांग्रेस छत्तीसगढ़ (जे) हा स्वतंत्र पक्ष स्थापन केला. काही काळापूर्वी झालेल्या अपघातात अजित जोगी यांचा एक पाय अधू झाला. तेव्हापासून अजित जोगी हे व्हिल चेअरवर होते.
”ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”