माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून ११० बेड्चे नियोजन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. अशा परिस्थितीत बेडची कमतरता लक्षात घेता आज एकाच दिवशी कराड येथे स्व. यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय हॉल येथे ५० बेड्चे, वडगाव हवेली येथे ३० बेड्चे व उंडाळे येथे ३० बेड्चे असे एकूण ११० बेडची व्यवस्था कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी माजी मुख्यमंत्री व आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून झाली आहे. माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते व पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत उदघाटन करण्यात आले.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य उदयसिंह पाटील, जिल्हा परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते जयवंतराव उर्फ बंडा नाना जगताप, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे, प्रांताधिकारी उत्तमराव दिघे, तहसीलदार अमरदीप वाकडे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके, पंचायत समिती सभापती प्रणव ताटे, नगरसेवक तथा शहर काँग्रेस अध्यक्ष राजेंद्र माने, नगरसेवक इंद्रजीत गुजर, माजी नगरसेवक प्रदीप जाधव, अशोकराव पाटील, डॉ. प्रमोद जाधव, तालुका वैद्यकीय अधिकारी, संगीता देशमुख, मंडलाधिकारी महेश पाटील, उंडाळेचे उदय पाटील (आबा), कराड दक्षिण काँग्रेसचे प्रवक्ते तानाजी चौरे आदी यावेळी उपस्थित होते.

यावेळी आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले कि , कोरोनाची पहिल्या लाटेनंतर दुसरी लाट आली आहे. या लाटेसाठी सज्ज राहून मुकाबला केला तरच टिकाव लागू शकेल. परंतु आपल्या देशाचे प्रधानमंत्री यांनी जानेवारी महिन्याच्या शेवटी केलेल्या आपल्या भाषणात सांगितले कि, भारताने कशाप्रकारे कोरोनावर मात केली, याचा बडेजाव त्यांनी संपूर्ण जगासमोर मारला. यामुळे आपल्या देशातील यंत्रणा ढिली पडली व पुढे उदभवलेल्या दुसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यास आपण कमी पडलो आहोत. परंतु आता प्रशासनाने व राज्य सरकारने कंबर कसली आहे. कोरोनाला हद्दपार करण्याची वेळ आली आहे आणि यासाठी योग्य ती खबरदारी घेतली जात असून सर्वांचे लसीकरण होणे तितकेच गरजेचे आहे.

Leave a Comment