माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा कराड शहर काॅंग्रेस कमिटीच्यावतीने सत्कार

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची काॅंग्रेसच्या शिस्तपालन कमिटीच्या अध्यक्षपदी निवड झाली असून त्यांनी कराड शहरासाठी 5 कोटी रूपयांचा निधी दिला आहे. त्यामुळे कराड शहर काॅग्रेस कमिटीच्यावतीने आ. पृथ्वीराज चव्हाण याच्या सत्कार करण्यात आला.

यावेळी नगरसेवक इंद्रजित गुजर, राजेंद्र माने, अशोकराव पाटील यांच्यासह काॅंग्रेस पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी इंद्रजित गुजर म्हणाले, आमचे नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावतीने कराड शहरासांठी 5 कोटी रूपये देण्यात आलेले आहे. त्यामुळे त्यांचे आभार मानत आहोत. विकासकामे हे पृथ्वीराज बाबाच करू शकतात हे कराड शहराने नेहमीच पाहिलेले आहे. आता मिळालेले 5 कोटी रूपये हे वाढीव भागासाठी वापरले जाणार आहेत. कराडात आरटीअो कार्यालय, भूकंप संशोधन केंद्र असो की कराड बसस्थानक आणि पोलिस वसाहत हे सर्व अतिशय सुसज्ज असे पृथ्वीराज चव्हाण यांच्या माध्यमातूनच झालेले आहे.

राजेंद्र माने म्हणाले, कराड शहराला मिळालेले 5 कोटी रूपयांतून पोपटभाई पेट्रोलपंप ते संगम हाॅटेल या दरम्यान रस्त्यावर पावसाचे पाणी साचत असते. त्या ठिकाणी बंदिस्त गटार करणे. तसेच वाढीव भागातही पावसाचे पाणी साचते तेथील काम केले जाणार आहे.