व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

शिवजयंतीनिमित्त वीरेंद्र सेहवागचं खास ट्विट, म्हणाला…

मुंबई । आज छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati shivaji maharaj) यांच्या जयंतीनिमित्त विविध नेते, अभिनेते, खेळाडू छत्रपतींना अभिवादन करणारे ट्विट करत आहेत. भारताचा धडाकेबाज माजी फलंदाज वीरेंद्र सेहवागने (Virendra Sehwag) छत्रपतींना अभिवादन करणारं खास ट्विट केलं आहे तसेच महाराजांना आपल्या ट्विटमधून अभिवादन केलं आहे.

वीरेंद्र सेहवागने शिवछत्रपतींच्या जयंतीदिनी खास ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये सेहवागने म्हटलंय, ”इतिहास आपल्याला सांगतो की शक्तिशाली लोक शक्तिशाली स्थळांवरुन येतात. पण इतिहास चुकीचा होता! सामर्थ्यवान लोक शक्तिशाली स्थळं बनवतात… छत्रपती शिवरायांना माझं वंदन…जय माँ भवानी”, असा नाराही त्याने आजच्या जयंतीदिनी आपल्या ट्विटमधून दिला आहे. तसंच शिवरायांचा अश्वावर आरुढ झालेला एक फोटो सेहवागने ट्विट केला आहे.

राज्यात तसंच देशात शिवजयंतीचा उत्साह पाहायला मिळतोय. ठिकठिकाणी शिवाजीराजांना अभिवादन केलं जातंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अनेक केंद्रीय मंत्री, विविध राज्यांचे मुख्यमंत्री, तसंच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आदींनी शिवजयंतीदिनी ट्विट करत राजेंच्या चरणी त्रिवार अभिवादन केलं आहे.

बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’.