कराड | कराड तालुक्यातील तांबवे येथील सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक, माजी मुख्याध्यापक बाळासाहेब दादासो पाटील ऊर्फ बापू यांचे वयाच्या 78 व्या वर्षी वृध्दपकाळाने निधन झाले. परिसरात व शैक्षणिक क्षेत्रात त्यांना बी. डी. पाटील सर म्हणून परिचित होत.
तांबवे येथील स्वातंत्र्य सैनिक अण्णा बाळा पाटील विद्यालयात त्यांनी 32 वर्षे सेवा बजावली. त्यामध्ये मुख्याध्यापक म्हणून 20 वर्षे कार्यकाल पार पाडला. यशवंत एज्युकेशन सोसायटीचे संचालक म्हणूनही काम पाहिले आहे. शिवाजीराजे नागरी पतसंस्थेचे संस्थापक संचालक म्हणून त्यांनी काम करत होते.
बी. डी. पाटील सर यांचा सामाजिक, राजकीय क्षेत्रात सहभाग असे. सुनील पाटील यांचे वडील होत. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, सुना,नातवंडे, भाऊ, पुतणे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरूवारी दि. 5 रोजी सकाळी तांबवे येथे होणार आहे.