माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांची जीभ घसरली ; धनंजय मुंडे यांच्याबाबत बोलतांना काहीतरीच “बरळले”

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीतील प्रचाराचं रण चांगलंच तापलं आहे. सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांवर जोरदार हल्ला चढवला आहे. भाजपचे नेते आणि माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर घणाघाती टीका केली असून रेणू शर्मा प्रकरणावरून मुंडेंना चांगलच धारेवर धरलं आहे. धनंजय मुंडे यांच्याबाबत बोलतांना माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे काहीतरीच “बरळले.”

भाजपचे उमेदवार समाधान औताडे यांच्या प्रचारासाठी सोमवारी पंढरपुरात सभा झाली. या सभेला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते. यावेळी भाजप नेते लक्ष्मण ढोबळे यांनी खास त्यांच्या स्टाईलमध्ये रेणू शर्माप्रकरणावरून धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला. “माय बहीण करवली म्हणून आली. धनंजय मुंडे म्हणाले, वहिनी तुम्ही आलात म्हणजे ताटात सांडलं काय आणि वाटीत सांडलं काय सारखच. दोघी बहिणी बहिणी एकत्र राहावा. मग एकदा वीज कनेक्शन घेतलं की मीटर पडणारच. मीटर पडलं. दोन पोरं झाली. त्या दोन पोरांना आपलं नाव दिलं. त्यांना विचारलं अरे तू नाव कसं देतोस? तेव्हा ते म्हणाले, मला अजिबात भीती वाटत नाही. महाराष्ट्रातील माझा लाडका नेता पुरोगामी आहे. असे नवीन विषय पुरोगामीत्वाचे स्वीकारले पाहिजे. असं सांगतानाच भाद्रपद महिन्यातल्या कुत्र्याला देखील लाज वाटते. पण धनंजय मुंडेंना लाज वाटली नाही”, अशी घणाघाती टीका ढोबळे यांनी केली.

“आमची चित्राताई वाघ वाघिणीसारखी हातात पायतण घेऊन उभी होती. नीट समजून घ्या”, असंही ढोबळे म्हणाले. ढोबळे यांची सभा चालू असताना त्यांच्या प्रत्येक वाक्यावर हशा आणि टाळ्या पडत होत्या. जसजश्या टाळ्या पडत होत्या. तसतशी ढोबळेंच्या शब्दांना धार चढत होती.

‘लोक विचारतात एका मतदारसंघाची निवडणूक आहे, काय फरक पडणार, त्याने सरकार बदलतंय का? अरे सरकार बदलायचं माझ्यावर सोडा, मी बघतो. पण या मतदारसंघाची निवडणूक महत्त्वाची आहे. या सरकारचा भ्रष्टाचार, जागा दाखवायची असेल तर ही पहिली संधी आहे’, अशा शब्दात देवेंद्र फडणवीसांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्ला चढवलाय.

You might also like