व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

जेव्हा माजी मंत्री मुळक म्हणाले, मला दंड करा!….

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ‘टिकलं ते पॉलिटिकल किस्से’

महाराष्ट्राचे माजी मंत्री, नागपूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजेंद्र मुळक लोहगाव विमानतळावर निघाले होते. गाडी खडकीच्या पुढं गेल्यावर एका चौकात पोलिसांनी त्यांच्या गाडीला हात केला. गाडी थांबली. एक पोलीस पुढं आले. त्यांनी सांगितलं,”मास्क घातले नाहीत. दंड भरावा लागेल.” बोलताना मास्क खाली घेतले होते. तेवढ्यात दंडाच्या पावतीच पुस्तक घेऊन एक महिला पोलीस कर्मचारी आल्या.

त्यांनी नाव विचारलं, तेवढ्यात गाडीतील एक व्यक्ती म्हणाली, हे माजी मंत्री राजेंद्र मुळक आहेत.’ अशी ओळख करून दिली. ती ओळख ऐकताच पोलिसांची देहबोली बदलली.मात्र राजेंद्र मुळक म्हणाले, “आय सपोर्ट पोलीस.चलन करा. आमची चूक झालीय. चूक ती चूक दंड घ्या.” आणि त्यांनी पाचशे रुपयाची नोट काढली. चलन केले.

गाडीत ते म्हणाले,”कायदे आपणच करतो.लोकांच्या हितासाठी करतो.मग हे कायदे आपण सांभाळले पाहिजेत. पोलीस बिचारे गेली सहा महिने जीवावर उदार होऊन कोरोनाशी लढत आहेत.मास्क आपल्या हितासाठी आहे.पोलिसांना त्याचा काय फायदा?आपल्यासाठीच ते लक्ष ठेवून काळजी घेत आहेत. त्यांना आपण मदत केली पाहिजे..”

एका माजी मंत्री महोदयांची ही मते ऐकल्यावर अनेक किस्से तुमच्या डोळ्यासमोर येतील. पोलिसांनी अडवलं की लगेच सरपंचापासून सभापती आमदारांना फोन करणारे कार्यकर्ते,आणि कार्यकर्त्यांच ऐकून पोलिसांना ‘त्यांना सोडा’ म्हणून फोन करणारे नेते. आणि सोडल्यावर पोलिसांच्याकडे तिरके बघत जाणारे अतिउत्साही कार्यकर्ते अशा अनेक घटना तुम्हीही पहिल्या असतील. या सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना माजी मंत्री राजेंद्र मुळक यांच्यासारख्या कायदा पाळणाऱ्या नेत्यांची नम्रता खूप भावते.

पूर्वीपासून काँग्रेसच्या विचारधारेत वाढलेले राजाभाऊ..नागपूरसारख्या जिल्ह्यात जिल्हा परिषदेवर पूर्ण क्षमतेने काँग्रेसची सत्ता आणतात.13 पंचायत समित्यापैकी 12 पंचायत समित्यांवर काँग्रेसची सत्ता आणण्यात मोलाची कामगिरी केलेले मूळक साहेब..सत्ता गेली म्हणून निराश न होता आणि सत्ता आहे म्हणून डामडौल न करणारा हा लीडर..मंत्रीपदावर काम करूनही एवढं साधं राहता येत. एवढी विनम्रता अंगी असू शकते हे आपल्या वर्तनातून दाखवणारा हा माणूस काँग्रेसचा नेता असाच असतो आणि असावा हे सांगून जातो.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”